Eknath Shinde : निवडणुकीआधी शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ठाण्यातून नवी योजना सुरू, लवकरच राज्यातही विस्तार...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ekanth Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आता आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधी आणखी एक योजना सुरू केली आहे.
ठाणे: विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आता आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीआधी आणखी एक योजना सुरू केली आहे. महिलांसाठी ही योजना असून ठाण्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे.
महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी राज्यात शिवसेना शिंदे गटाकडून एक नवा उपक्रम राबवला जाणार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली असून, तिचा शुभारंभ रविवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
'लाडकी सून योजना' काय?
या योजनेअंतर्गत घरगुती अत्याचार, अन्याय किंवा कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या सुनांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्यभर मोहिमेचे जाळे उभारले जाणार आहे. यासाठी खास हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाल्यास संबंधित महिलांना थेट संपर्क साधून मदत मिळणार आहे.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “लाडक्या सुनांच्या प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच लाडक्या सासूंचाही योग्य सन्मान या योजनेतून केला जाईल. घरातील नातेसंबंध जपणे आणि महिलांचा सन्मान वाढवणे हे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात प्रत्येक शिवसेना शाखा व कार्यालयातून मदत उपलब्ध करून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर शाखा पदाधिकारी सुनांच्या समस्यांवर मार्गदर्शन व सहकार्य करतील.
advertisement
या राज्यव्यापी मोहिमेची जबाबदारी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्या महिलांच्या प्रश्नांवर काम करत असून, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पथके तयार केली जाणार आहेत.
लाडक्या सासूंचाही सन्मान...
‘लाडकी सून योजना’मुळे महिलांच्या हक्कांचे रक्षण होईलच, शिवाय कौटुंबिक वाद टाळून सासू–सून नात्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील शुभारंभानंतर ही योजना लवकरच संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. “लाडक्या सुनांचा प्रश्न सोडवण्यासोबतच लाडक्या सासूंचाही योग्य सन्मान होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : निवडणुकीआधी शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ठाण्यातून नवी योजना सुरू, लवकरच राज्यातही विस्तार...