Kolhapur Crime : ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार,दोघे बुडाले अन् खुनी झाले, कोल्हापूरमधील भयानक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ऑनलाईन रम्मी खेळता खेळता दोन मित्र कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी दोघांनी चोरीचा कट रचला होता.
Kolhapur Crime News : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ऑनलाईन रम्मी खेळता खेळता दोन मित्र कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी दोघांनी चोरीचा कट रचला होता. ही चोरी करता करता दोघेही एका महिलेची हत्याकरून बसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आता कोल्हापूरच्या लोकल क्राइम ब्रांचने दोन मित्रांना अटक केली आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पणोरे गावात राहणाऱ्या मारुती पाटील आणि कपिल पातळे या दोन बालमित्रांना ऑनलाईन रम्मी खेळण्याचा नाद लागला होता.या नादापाई दोघेही रम्मी खेळता खेळता कर्जबाजारी झाले होते. दोघांवर लाखो रूपयांच कर्ज झालं होतं. त्यामुळे कर्जातून बाहेर पडण्यासाठी दोन्ही मित्रांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला होता.
चोरी करायला गेले आणि हत्या करून आले
advertisement
कर्ज फेडण्यासाठी दोघांनी चोरीचा डाव रचला. त्यानुसार गावातीलच 73 वर्षीय वृद्ध महिला श्रीमंती रेवडेकर या महिलेचं दागिने चोरण्याचा कट रचला होता.दोन्ही मित्रांनी यासाठी मोठी प्लानिंग केली होती.आणि अनंत चतुदर्शीच्या दिवशी चोरी करण्याचा प्लान रचला होता.
कारण अनंत चतुर्थी दिवशी गावात गणेश विसर्जन मिरवणुका आणि घरात एकटी महिला असल्याची संधी साधून तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा त्यांचा डाव होता. त्यानुसार दोघेही मित्र महिलेने घरात घुसले आणि दागिने चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी रेवडेकर यांनी प्रतिकार केला. त्यामुळे आपला प्लॅन फसू नये यासाठी दोघांनी तिच्या डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोबर गॅस मध्ये टाकून दिला होता.आणि दोघांनी दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता.
advertisement
या घटनेनंतर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आणि राधानगरी पोलीसांनी समांतर तपास सुरू केला.दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपीनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली.त्यानंतर पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या खूनाची कबुली दिली आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 10, 2025 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Crime : ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार,दोघे बुडाले अन् खुनी झाले, कोल्हापूरमधील भयानक घटना