Driving Fact : भारतात उजवीकडे, अमेरिकेत डावीकडे का असतं गाडीचं स्टेअरिंग, अखेर कोणती ड्रायव्हिंग पद्धत सर्वात सुरक्षित?

Last Updated:
कारचे मोठे ब्रँड जे अमेरिका-युरोप सारख्या देशात देखील आपल्या गाड्या सेल करतात आणि भारतात देखील त्यांचे शॉप आहेत. या अशा कंपन्या ही देशांनुसार आपल्या गाडीच्या स्टेअरिंची बाजू बदलतात असं का?
1/9
आपल्यापैकी अनेकांनी  कार, बस किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहनाने प्रवास केला असेल, त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल. आपल्याकडे सगळ्याच गाड्यांच्या उजव्या बाजूला गाडीचं स्टेअरिंग असतं. पण तेच बाहेरील देशांमधील गाड्यांना मात्र स्टेअरिंग हे विरुद्ध दिशेला असतं असं का?

advertisement
2/9
कारचे मोठे ब्रँड जे अमेरिका-युरोप सारख्या देशात देखील आपल्या गाड्या सेल करतात आणि भारतात देखील त्यांचे शॉप आहेत. या अशा कंपन्या ही देशांनुसार आपल्या गाडीच्या स्टेअरिंची बाजू बदलतात असं का? गाड्यांच्या फीचरचा किंवा डिझाइनचा हा नियम वेगवेगळ्या देशांप्रमाणे का बदलतो? कधी असा प्रश्न पडलाय? आणि या दोन्ही पद्धतींपैकी कोणती पद्धत जास्त सुरक्षित आहे? चला, त्यामागचं कारण जाणून घेऊया.

3/9
लेफ्ट साइड ड्रायव्हिंगची ऐतिहासिक कारणंडाव्या बाजूने वाहन चालवण्याची परंपरा अगदी जुनी आहे. शेकडो वर्षांपूर्वी लोक घोडागाडी किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे. त्या काळी बहुतेक लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. कारण जगात जास्तीत जास्त लोक उजव्या हाताचे (राईट-हॅन्डेड) असतात. जर हल्ला झाला, तर उजव्या हाताने शस्त्र काढून स्वतःचा बचाव करणे डाव्या बाजूला असताना अधिक सोपे व्हायचे. हळूहळू ही सवय कायम राहिली.
लेफ्ट साइड ड्रायव्हिंगची ऐतिहासिक कारणं
डाव्या बाजूने वाहन चालवण्याची परंपरा अगदी जुनी आहे. शेकडो वर्षांपूर्वी लोक घोडागाडी किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे. त्या काळी बहुतेक लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. कारण जगात जास्तीत जास्त लोक उजव्या हाताचे (राईट-हॅन्डेड) असतात. जर हल्ला झाला, तर उजव्या हाताने शस्त्र काढून स्वतःचा बचाव करणे डाव्या बाजूला असताना अधिक सोपे व्हायचे. हळूहळू ही सवय कायम राहिली.
advertisement
4/9
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मोटारींचा वापर सुरू झाला, तेव्हाही अनेक देशांनी हीच पद्धत पुढे नेली. भारत आजही अशा देशांपैकी एक आहे, जिथे गाड्या डाव्या बाजूने चालवल्या जातात. त्यामुळे येथील गाड्यांचं स्टेअरिंग हे उजव्या बाजूला असतं.

5/9
जगातील बहुतेक देश मात्र पुढे राईट साइड ड्रायव्हिंगकडे वळले. जिथे कारचं स्टेअरिंग डाव्या बाजूला असतं. यामागे एक मोठं कारण होतं 1792 मधली फ्रेंच क्रांती. त्या काळात फ्रान्समध्ये गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने धावू लागल्या आणि हा पद्धतशीर बदल हळूहळू युरोपातील इतर देशांमध्ये पसरला.

6/9
स्वीडनने तर1965  मध्ये अचानक बदल करून राईट साइड ड्रायव्हिंग स्वीकारलं. कारण त्या वेळी स्वीडनमध्ये राईट साइड ड्रायव्हिंग असलेल्या देशांमधून कार आयात होऊ लागल्या होत्या. शिवाय हा बदल सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य मानला गेला.

7/9
कोणती पद्धत जास्त सुरक्षित?आजच्या घडीला जगातील बहुतांश देश राईट साइड ड्रायव्हिंग पद्धत वापरतात. ज्यामुळे तिथे डावीकडे गाडीचं स्टेअरिंग असतं. रिपोर्ट्सनुसार, ही पद्धत रस्ते सुरक्षेसाठी अधिक सुरक्षित मानली जाते.
कोणती पद्धत जास्त सुरक्षित?
आजच्या घडीला जगातील बहुतांश देश राईट साइड ड्रायव्हिंग पद्धत वापरतात. ज्यामुळे तिथे डावीकडे गाडीचं स्टेअरिंग असतं. रिपोर्ट्सनुसार, ही पद्धत रस्ते सुरक्षेसाठी अधिक सुरक्षित मानली जाते.
advertisement
8/9
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, ज्या देशांमध्ये राईट साइड ड्रायव्हिंग आहे, तिथे अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण लेफ्ट साइड ड्रायव्हिंग देशांच्या तुलनेत कमी आहे. एका अभ्यासात तर हेही समोर आलं की राईट साइड ड्रायव्हिंग असलेल्या देशांमध्ये ट्रॅफिक अपघातांमध्ये जवळपास 40% घट होते.

9/9
लेफ्ट आणि राईट दोन्ही पद्धतींना आपापली ऐतिहासिक आणि सामाजिक कारणं आहेत. पण आधुनिक काळात राईट साइड ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित मानलं जातं. तरीही भारतासह अनेक देश आजही जुन्या परंपरेनुसार डाव्या बाजूची पद्धत वापरत आहेत. म्हणून आपल्याकडील गाड्यांचं स्टेअरिंग उजव्या बाजूला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement