तब्बल 50 वर्षांनी आला सुवर्णयोग! आजपासून या राशींच्या लोकांकडे श्रीमंती येणार,सोनं नाणं सगळचं मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात. त्यापैकी त्रिग्रही योग हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या योगाचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर, समाजावर तसेच देश-विदेशातील घडामोडींवर दिसून येतो.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात. त्यापैकी त्रिग्रही योग हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. या योगाचा थेट परिणाम मानवाच्या जीवनावर, समाजावर तसेच देश-विदेशातील घडामोडींवर दिसून येतो. द्रिक पंचांगानुसार, 26 जुलै 2025 रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला. याच वेळी गुरु ग्रह आधीपासूनच मिथुन राशीत विराजमान आहेत. यामुळे शुक्र आणि गुरु ग्रहांची युती तयार झाली आहे.
आता 18 ऑगस्ट 2025 रोजी चंद्र देखील मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मिथुन राशीत शुक्र, गुरु आणि चंद्र हे तीन ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग निर्माण होईल. या विशेष योगामुळे काही राशींना अपार लाभ मिळणार आहे. चला तर पाहूया कोणत्या राशींवर या योगाचा अधिक सकारात्मक परिणाम होईल.
तूळ रास
तूळ राशीसाठी हा योग अत्यंत शुभदायी ठरणार आहे. या राशीच्या भाग्यभावात त्रिग्रही योग तयार होत असल्याने नशिबाची साथ उत्तम मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील, तर नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्याही हा काळ अनुकूल ठरेल. संपत्ती वाढ, अचानक धनलाभ आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. याशिवाय धार्मिक व सामाजिक कार्यात तुमची उपस्थिती वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळेल.
advertisement
मिथुन रास
मिथुन राशीमध्येच हा त्रिग्रही योग जुळत असल्याने या राशीच्या व्यक्तींना मोठा फायदा मिळणार आहे. या काळात विवाहासाठी चांगल्या स्थळांचा योग जुळेल. व्यवसाय आणि नोकरीत अनपेक्षित प्रगती होईल. कोर्ट-कचेरी किंवा अडकलेली शासकीय कामे यशस्वीरित्या पार पडतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरेल. मानसिक शांती मिळेल आणि आरोग्य उत्तम राहील. एकूणच सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील.
advertisement
कन्या रास
कन्या राशीच्या कुंडलीतील कर्मभावात हा योग जुळून येत असल्याने व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळेल. व्यवसायात नफा वाढेल तसेच नवीन करार किंवा डील्स फायदेशीर ठरतील. दीर्घकाळ अडकलेले प्रकल्प वेगाने पुढे जातील. हा काळ मेहनतीचं उत्तम फळ देणारा असेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि वैयक्तिक आयुष्यातही समाधान लाभेल.
advertisement
दरम्यान, 26 जुलै ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत तयार होणारा त्रिग्रही योग काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. विशेषतः तूळ, मिथुन आणि कन्या राशीच्या जातकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक जीवनात भरभराटीचे दिवस अनुभवायला मिळतील. या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योग्य निर्णय घेतल्यास भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी हा कालखंड महत्त्वाचा ठरेल.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकारिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 6:37 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
तब्बल 50 वर्षांनी आला सुवर्णयोग! आजपासून या राशींच्या लोकांकडे श्रीमंती येणार,सोनं नाणं सगळचं मिळणार