Creta चा विषयच वेगळा, पण Hyundai ही आधी Car च तयार करत नव्हती! अशी झाली कंपनीची सुरुवात!
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतात येण्याआधी Hyundai कंपनी नेमकी काय करत होती, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
भारतात सध्या अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. भारतीय टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती यांच्या गाड्या तरच आहे. पण, परदेशी वाहन उत्पादकांची कमी नाही. यामध्ये Hyundai ही एक अशी कंपनी आहे, जी सर्वाधिक वाहनांची विक्री करते. Hyundai ही मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सला सुद्धा टक्कर देते. मागील काही वर्षांपासून क्रेटा, Venue, Grand i10 Nios. Hyundai i20 आणि Hyundai Exter या गाड्यांनी भारतीयांच्या मनावर राज्य केलं आणि करत आहे. पण, भारतात येण्याआधी Hyundai कंपनी नेमकी काय करत होती, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Hyundai मुळात एक दक्षिण कोरियन ब्रँड आहे. ही कंपनी १९९६ मध्ये भारतात आली. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (Hyundai Motor India Limited) ची स्थापना ६ मे १९९६ रोजी झाली. कंपनीने तामिळनाडूतील चेन्नईजवळील श्रीपेरुम्बुदुर येथे आपले पहिले आणि मोठे उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग प्लांट) उभारले. 1996 पासून कंपनीने वाहनांची निर्मिती सुरू केली. त्यांची पहिली कार होती Santro. हुंदाईने Santro ही १९९८ मध्ये भारतात लाँच केली. Santro अल्पवधीत लोकप्रिय झाली आणि मारुती सुझुकीच्या वॅगनर आणि मारुती ८०० ला टक्कर देऊ लागली. तिथून या कंपनीचा प्रवास आज क्रेटापर्यंत पोहोचला आहे. सध्या hyundai ने भारतात सँट्रोच्या यशानंतर ह्युंदाईने ॲक्सेंट (Accent) सारख्या सेडान गाड्या लाँच केल्या. त्यानंतर आय१० (i10), आय२० (i20), वरना (Verna) आणि नंतर क्रेटा (Creta) आणि व्हेन्यू (Venue) यांसारख्या गाड्यांनी कंपनीला भारतात सतत वाढण्यास मदत केली.
advertisement

कंपनी आधी करत काय होती?
Hyundai मोटर कंपनीचे संस्थापक चुंग जू-युंग (Chung Ju-yung) आहेत. ते दक्षिण कोरियाचे एक मोठे उद्योजक होते. १९४७ मध्ये चुंग जू-युंग यांनी Hyundai Engineering & Construction Company ची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत होती. 'Hyundai' या कोरियन शब्दाचा अर्थ 'आधुनिक युग' (modern era) असा आहे, जो नवीन युगाच्या आगमनाचे प्रतीक आहे. १९६७ मध्ये चुंग जू-युंग यांनी Hyundai Motor Company ची स्थापना करून ऑटोमोबाइल उद्योगात प्रवेश केला. ही कंपनी हुंडई ग्रुपचा एक भाग होती. १९६८ मध्ये हुंडईने फोर्ड मोटर कंपनीसोबत भागीदारी करून त्यांची पहिली कार, 'कॉर्टिना', तयार केली.
advertisement

(hyundai कॉर्टिना)
त्यानंतर hyundai ने १९७५ मध्ये आपली पहिली स्वतःच्या डिझाइनची कार 'पोनी' (Pony) लाँच केली. ही दक्षिण कोरियाची पहिली मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलेली कार होती. 'पोनी' ला इटालियन डिझायनर गियोर्जियो गियुगियारो यांनी डिझाइन केले होते, तर तिच्या पॉवरट्रेनसाठी मित्सुबिशी मोटर्सची मदत घेतली होती.
advertisement

(hyundai pony)
दक्षिण कोरियामध्ये धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर hyundai ने १९८६ मध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश केला. त्यांची 'एक्सेल' (Excel) कार खूप लोकप्रिय झाली. पुढे १९९८ मध्ये hyundai ने किआ मोटर्स (Kia Motors) चं अधिग्रहण केलं, ज्यामुळे त्यांची ताकद खूप वाढली. आज hyundai मोटर ग्रुपमध्ये किआ मोटर्स आणि जेनेसिस मोटर्स (Genesis Motors) यांचा समावेश आहे आणि जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांपैकी एक आहे.
advertisement
आज hyundai कंपनीचे मुख्यालय दक्षिण कोरियाची राजधानी सियोल इथं आहे. hyundai जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या गाड्या जगभरात १९३ पेक्षा जास्त देशांमध्ये विकल्या जातात. भारतातही सर्वाधिक गाड्यांची विक्री करणारी hyundai सुद्धा एक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 11:41 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Creta चा विषयच वेगळा, पण Hyundai ही आधी Car च तयार करत नव्हती! अशी झाली कंपनीची सुरुवात!