कुत्रा एका क्षणात गायब झाला
ही क्लिप फक्त 12 सेकंदांची आहे, ज्यामध्ये एक तलाव दिसत आहे. एक काळा-पांढरा कुत्रा तलावाकडे धावत येतो. तो तलावाच्या काठावर उभा असतो, तेव्हा अचानक एक मोठी मगर पाण्यातून बाहेर येते आणि कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून पुन्हा पाण्यात गायब होते. काही सेकंदात, कुत्रा आणि मगर दोघेही दिसत नाहीत. नंतर दुसरा कुत्रा त्याच्या साथीदाराला शोधत तिथे येतो. पण व्हिडिओ इथेच संपतो.
advertisement
व्हिडिओ बनवणाऱ्यावर टीका
हा व्हिडिओ 7 मार्च रोजी @TheBrutalNature या हँडलने X (ट्विटर) वर पोस्ट केला होता. ही बातमी लिहीपर्यंत, त्याला 37 हजारांहून अधिक लाईक्स आणि पाचशेहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. युजर्स कुत्र्याच्या मालकावर रागावत आहेत, ज्याने कुत्र्याला इतक्या धोकादायक ठिकाणी जाऊ दिले आणि वाचवण्याऐवजी व्हिडिओ बनवत बसला. एका युजरने लिहिले - बिचारा कुत्रा. दुसऱ्याने कमेंट केली - पण कुत्रा तिथे का गेला?
हे ही वाचा : Snake Facts : खतरनाक किंग कोब्रा कुणाला घाबरतो? आहे छोटासा जीव, पण भिडला तर साप तडफडून मरतो
हे ही वाचा : Alcohol Fact : Beer की Whisky कोणते पेय कमी नुकसानकारक? तज्ज्ञ काय सांगतात?
