advertisement

Alcohol Fact : Beer की Whisky कोणते पेय कमी नुकसानकारक? तज्ज्ञ काय सांगतात?

Last Updated:

आजच्या काळात बिअर आणि व्हिस्की हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. तसं पाहाता दोन्ही शरीरासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक ते पितात आणि दोघांपैकी शरीरासाठी काय कमी नुकसानकारक आहे? या विचारात देखील असतात. चला जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : अल्कोहोल आरोग्यासाठी चांगला नसल्याचं मानलं जातं, पण थोडं प्रमाणात मद्यपान केल्यास काही आरोग्य फायदे देखील मिळू शकतात. असं काही लोकांचं म्हणणं आहे. प्राचीन काळात काही अल्कोहोलिक पेये औषधी म्हणून वापरली जात होती, परंतु आजच्या काळात बिअर आणि व्हिस्की हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत.
कोणते पेय आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे? चला जाणून घेऊ.

दोघींमधील अल्कोहोलच्या प्रमाणातील फरक

बिअर: 4-6% अल्कोहोल असतो. त्याच्या कमी प्रमाणामुळे लोक बिअर जास्त प्रमाणात पितात.
व्हिस्की: साधारणपणे 40% किंवा त्याहून अधिक अल्कोहोल असतो, ज्यामुळे कमी प्रमाणात प्यायलं तरी ते जास्त प्रभावी ठरतं.

कॅलरीज आणि वजन व्यवस्थापन:

बिअर: एका पाइंटमध्ये सुमारे 150-200 कॅलरीज असतात. त्यामुळे नियमित बिअरमुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
advertisement
व्हिस्की: एका शॉटमध्ये (30 mL) सुमारे 70 कॅलरीज असतात, त्यामुळे कमी कॅलरीजमुळे वजन नियंत्रणात ठेवता येतं.

हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?

बिअरमध्ये पॉलिफेनॉल्स आणि B जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. व्हिस्कीमध्ये एलाजिक अॅसिड सारखा शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतो, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. दोन्ही पेयांमध्ये काही हृदय फायदे असू शकतात, परंतु व्हिस्कीची अँटिऑक्सिडंट शक्ती थोडी अधिक प्रभावी मानली जाते.
advertisement

यकृताच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?

जास्त प्रमाणात बिअर पिणं यकृतावर ताण आणू शकते. त्याचबरोबर, बिअरमध्ये सिलिकॉन असतो ज्यामुळे हाड मजबूत होतात, पण हा फायदा फक्त थोड्या प्रमाणात मद्यपान केल्याने मिळू शकतो.
व्हिस्की, जरी अधिक मजबूत असली तरी मध्यम प्रमाणात घेतल्यास त्याचा एकूण अल्कोहोलचा प्रभाव कमी पडतो.
तज्ञ म्हणतात की, कोणतंही अल्कोहोलिक पेय आरोग्यासाठी फायदेमंद ठरू शकतं, परंतु त्याचं प्रमाण खूपच कमी असावं. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास हृदय, यकृत आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
advertisement
(वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Alcohol Fact : Beer की Whisky कोणते पेय कमी नुकसानकारक? तज्ज्ञ काय सांगतात?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement