advertisement

शनिवारवाडा परिसरात आगीचा थरार! देसाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पळापळ; नेमकं काय घडलं?

Last Updated:
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या भिंतीपासून ही आग काही अंतरावरच असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
1/7
पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या शनिवारवाडा परिसरात गुरुवारी दुपारी आगीची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शनिवारवाड्याच्या अगदी जवळ असलेल्या देसाई कॉलेजसमोरील कचरा आणि वाळलेल्या फांद्यांनी अचानक पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला होता.

2/7
 मात्र, पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रचंड तत्परतेमुळे ही आग वेळीच विझवण्यात यश आले आणि एक मोठा अनर्थ टळला. शनिवारवाडा परिसरातील देसाई कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला-पाचोळा आणि वाळलेल्या फांद्या साठवून ठेवण्यात आल्या होत्या. दुपारी अचानक या ढिगाऱ्याने पेट घेतला.

3/7
उन्हाची तीव्रता आणि वाळलेला कचरा यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती.

4/7
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या भिंतीपासून ही आग काही अंतरावरच असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून काही मिनिटांतच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

5/7
 वेळीच आग आटोक्यात आली नसती, तर ती जवळच असलेल्या झाडांना आणि कॉलेजच्या इमारतीला लागण्याची शक्यता होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

6/7
शनिवारवाडा हा पुण्याचा ऐतिहासिक वारसा असल्याने येथे आगीची बातमी समजताच प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. वाळलेला पाला-पाचोळा आणि कचरा वेळेत न उचलल्यामुळेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

7/7
या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता,

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement