पण फक्त मोबाईल कॅमेराने फोटो काढणं पुरेसं नसतं. त्यात थोडं क्रिएटिव्ह एडिटिंग केलं, तर तो फोटो खरोखर लोकांचं अटेंशन मिळवू शकतो. पण यासाठी आता तुम्हाला व्यावसायिक एडिटरची गरज नाही, कारण Google Gemini AI आणि Nano Banana सारखी नवी AI साधनं तुमचं हे काम अगदी सहज करून देऊ शकतात.
हो गुगल जेमिनीवर तुम्ही नवीन ट्रेंड फॉलो करुन तुमचे दिवाळीचे फोटो आणखी एस्थेटिक आणि सुंदर बनवू शकता. शिवाय तुम्ही आपल्या फोटोंना अगदी सिनेमॅटिक आणि रिअॅलिस्टिक टच देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला फोटोमध्ये दिवाळीचा मूड आणायचा असेल, तर तुमचा पोशाख, पार्श्वभूमी, प्रकाशयोजना आणि वातावरण हे सर्व तुम्ही फक्त प्रॉम्प्टमध्ये लिहून ठरवू शकता.
advertisement
तुमचा फोटो “Hyper-realistic 4K portrait” किंवा “Cinematic 8K HD Image” स्वरूपात हवा असेल, तर हे शब्द प्रॉम्प्टमध्ये टाकल्याने फोटो अधिक आकर्षक आणि स्पष्ट दिसेल.
पण यासाठी काय करावं लागेल? यासाठी आम्ही काही ट्रिक सांगणार आहोत.
योग्य थीम आणि बॅकग्राउंड निवडा
दिवाळीच्या वातावरणासाठी तुम्ही काही विशेष थीम शब्द वापरू शकता जसे
Diwali night
Courtyard with rangoli
Rooftop terrace
Temple puja scene
हे शब्द AI ला सांगतात की तुम्हाला फोटोमध्ये कोणतं वातावरण दाखवायचं आहे, ज्यामुळे तो अधिक वास्तवदर्शी तयार होतो.
कपड्यांचा रंग आणि लूक ठरवा
AI फोटो एडिट करताना तुमच्या कपड्यांचा लूकही तुम्ही ठरवू शकता. उदाहरणार्थ, “red silk saree with golden embroidery” किंवा “navy blue kurta with mirror work” असं लिहिल्यास तुमच्या फोटोतील पोशाख अगदी त्या वर्णनानुसार दिसेल.
प्रकाशाचा प्रभाव वाढवा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, त्यामुळे फोटोमध्ये लाइटिंग महत्त्वाची भूमिका बजावते.
तुम्ही प्रॉम्प्टमध्ये warm golden glow, soft candlelight किंवा cinematic lighting असे कीवर्ड्स वापरू शकता, ज्यामुळे फोटोमध्ये प्रकाश अधिक नैसर्गिक आणि आकर्षक दिसेल.
फोटो एडिट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
फोटो एडिटसाठी नेहमी तुमचा बेस्ट फोटो निवडा, चेहरा स्पष्ट आणि प्रकाश चांगला असावा.
जर तुम्ही फोटो एडिट करत आहात (नवीन तयार करत नाही), तर प्रॉम्प्टमध्ये “Maintain 100% facial likeness” हा कीवर्ड जोडा. यामुळे AI तुमचा चेहरा बदलणार नाही.
वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून प्रयोग करा. लाइटिंग, रंग, बॅकग्राउंड आणि थीम बदलत जा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिवाळी फोटो मिळेल.