पाणी किंवा कोल्ड ड्रिंक च्या बाटल्या रिकाम्या झाल्या की शक्यतो त्या आपण कचर्यात फेकतो. पण ही बाटली इतकी कामाची आहे की तुम्ही विचारही केला नसाल. दिवाळीत साफसफाई सारखं मोठं मेहनतीचं काम या बातमीमुळे हलकं होईल. आता ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग पाहूयात.
नेमकं करायचं काय?
advertisement
प्लॅस्टिक बाटली घ्यायची. त्यावरील लेबल काढून टाकयचं. एक लांब पाइप, काठी किंवा दांडा घ्या. हा पाईप बाटलीत जाईल असा होल बाटलीच्या मधोमध पाडा. त्यात पाईप घुसवा. बाटली हलणार नाही अशा पद्धतीने ती पाइपवर घट्ट बसवा.
Jugaad Video : कांद्यात घुसवला खिळा; मोठ्या समस्येतून सुटका
एक जुना टीशर्ट पाण्यात भिजवून घ्या आणि तो त्या पाइपला लावलेल्या बाटलीला गुंडाळा.
इथं पाहा व्हिडिओ
Ayeshas kitchen hack यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
याचा फायदा काय?
हा तुमचा होममेड क्लीनर वाइप तयार झाला. हा तुम्ही जमिनीवर फिरवला की जमीन आणि भिंतीवर फिरवला की भिंत स्वच्छ होईल. उंचावर असलेल्या वस्तूही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता.
Jugaad Video : घरात ठेवा फक्त बाटल्यांची झाकणं, उंदीर स्वतःच घराबाहेर पळतील
तुम्हाला हात लावून किंवा खाली वाकून स्वच्छता करायची गरज नाही. अगदी काही तासात फार मेहनत न घेता तुम्ही घर स्वच्छ करू शकता.