Jugaad Video : घरात ठेवा फक्त बाटल्यांची झाकणं, उंदीर स्वतःच घराबाहेर पळतील

Last Updated:

तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही छोटीशी झाकणं तुम्हाला उंदरांच्या त्रासापासून सुटका देऊ शकतात. या अजब जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : पाणी किंवा ज्युसच्या बाटल्या रिकाम्या झाल्या की त्या आपण शक्यतो फेकून देतो. पण या बाटलीची झाकणं खूप कामाची आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही छोटीशी झाकणं तुम्हाला उंदरांच्या त्रासापासून सुटका देऊ शकतात. या अजब जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
घरात कितीही स्वच्छता ठेवा, काहीही करा, उंदीर होतातच. उंदरांना मारण्यासाठी त्यांना घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करत नसाल. तरी उंदरांचा त्रास काही कमी होत नाही. आता सोशल मीडियावर बाटलीच्या झाकणाने उंदरांना न मारता घराबाहेर काढण्याच्या उपाय दाखवण्यात आला आहे. यामध्ये 2 मिनिटांत उंदीर स्वतःत पळतील असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
आता करायचं काय?
तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसनही वापरू शकता. बेसन शक्यतो खराब झालेलं वापरा जेणेकरून ते वाया जाणार नाही. या पिठात एक्सपायर झालेलं औषध, लाल मसाला, लाल मसाला नसेल तर हिरवी मिरची वापरू शकता. आता सगळं मिक्स करा. थोडं पाणी टाकून मिश्रण नीट मळून घ्या. पाणी थोडं थोडं टाका. पीठ एकदम घट्ट आणि एकदम मुलायमही नसावं.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
बाटल्यांच्या झाकणाचं काय करायचं?
आता तुम्ही म्हणाल इथं बाटल्यांचा झाकणाचा उल्लेख कुठे केला आहे. तर आता या स्टेपला तुम्हाला वापराचं आहे बाटलीचं झाकण. तुम्ही तयार केलेलं पीठ किंवा मिश्रण या झाकणात भरायचं आहे. उंदीर प्लॅस्टिककडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे प्लॅस्टिकच्या झाकणातच हे मिश्रण भरा.  जिथून उंदीर येतात, जिथं तुम्हाला दररोज उंदीर दिसतात अशा ठिकाणी ही मिश्रण भरलेली झाकणं ठेवा.
advertisement
या औषधाने उंदीर मरणार नाहीत. पण त्यांच्या शरीरात असं काही होईल की घरातून बाहेर पळून जातील. त्यांना हवेची गरज भासेल, असं या महिलेनं सांगितलं आहे.
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : घरात ठेवा फक्त बाटल्यांची झाकणं, उंदीर स्वतःच घराबाहेर पळतील
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement