साबण वापरण्याआधी त्यावर खिळा जरूर मारा; का ते पाहा Jugaad Video

Last Updated:

Jugaad Video : तुम्हाला हे विचित्र वाटेल. पण याचा मोठा फायदा आहे. साबणावर खिळा मारण्याचा हा जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब
फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली :  साबणाचा वापर आपण दररोज करतो. अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी. पण साबण वापरण्याआधी तुम्ही त्यावर कधी खिळा मारून पाहिला आहे. तुम्हाला हे विचित्र वाटेल. पण याचा मोठा फायदा आहे. साबणावर खिळा मारण्याचा हा जुगाड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
साबण वापरण्याआधी त्याला खिळा मारण्याचा फायदा एका महिलेनं दाखवला आहे. तिनं दाखवल्यानुसार साबणाच्या एका टोकात तुम्हाला खिळा टाकायचा आहे. खिळा आरपार जायला हवं. यामुळे साबणाला छिद्र पडेल. आता या छिद्रात तुम्हाला एक दोरा टाकून तो बांधून घ्यायचा आहे.
advertisement
यासाठी तुम्ही जे शेवटी साबणाचे छोटे छोटे तुकडे राहतात ते एकत्र करून त्यापासून मोठा साबण तयार करून त्याचाही वापर करू शकता. यामुळे साबणाचे तुकडेही वाया जाणार नाही.
इथं पाहा व्हिडीओ
नेमकं काय आणि कसं करायचं ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. पुणेरी तडका युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
याचा फायदा काय?
आता याचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर साबण असाच कुठेही पृष्ठभागावर ठेवला तर तो लवकर संपतो. पण असा लटकवून ठेवला तर तो वाया जाणार नाही.  तसं हात धुण्यासाठी हँडवॉश असतो. पण काही वेळा हँडवॉश संपतो तेव्हा किंवा आजही काही लोक हँडवॉशऐवजी साबणाचे तुकडे वापरतात. जे आपण वॉश बेसिनवर ठेवतो. पण मग तो घसरून बेसिनच्या आत किंवा खाली पडतो. अशावेळी ही ट्रिक फायद्याची ठरेल. तुम्ही साबणात अशी दोरी टाकून तो लटकवून ठेवू शकता. महिनाभर तुम्हाला तो वापरता येईल.
advertisement
साबण लवकर संपू नये म्हणून आणखी काय करता येईल?
बाथरूममध्ये कपडे धुण्याचा किंवा अंगाला लावण्याचा साबण अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्यावर पाणी पडणार नाही. कारण पाणी साबणावर पडल्यास तो वेगानं गळतो. तसंच बाथरूममध्ये दिवसभर ओलावा असेल, अशा ठिकाणी ठेवलेला साबण कधीही सुकत नाही आणि ओला राहिल्यानं तो गळतो. त्यामुळे साबण कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवावा. बाथरूममध्ये जागा असेल तर वापरल्यानंतर साबण खिडकीजवळ ठेवा, जेणेकरून तो सुकेल.
advertisement
अनेकदा साबण गळून जमिनीवर पसरतो. अशावेळी साबण जमिनीवर पसरण्यापासून रोखण्यासाठी साबण ठेवण्यासाठी एक बॉक्स घ्या. या बॉक्सवर दोन रबरबँड लावा, व साबण वापरल्यानंतर तो रबर बँडवर ठेवा. यामुळे साबण कमी गळेल. तसेच गळणारा साबण बॉक्समध्ये साचेल. या साबणाचा वापर तुम्ही कपडे धुण्यासाठी करू शकता.
मराठी बातम्या/Viral/
साबण वापरण्याआधी त्यावर खिळा जरूर मारा; का ते पाहा Jugaad Video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement