रबर बॅंड तुम्हीही वापरत असाल मात्र ते कसं बनवलं जातं, त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे याविषयी फार कमी लोकांना माहित असतं. सध्या व्हायरल होत असलेला रबर बॅंड मेकिंगकचा व्हिडीओ फारच चर्चेत आला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, झाडापासून दूध काढलं जातं. त्यामध्ये रंग मिसळले जातात. यानंतर रबर बनवण्यासाठी काही काड्यांचा साचा या द्रवात बुडवून त्यावर दोन-तीन कोट लावले जातात. पाण्यात थंड केल्यानंतर ते बाहेर काढले जाते आणि मशीनद्वारे कापले जाते. रिजल्ट पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
advertisement
foodexplorerlalit नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्स पहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यामध्ये अशा रोजच्या वापरातल्या गोष्टींविषयी माहिती दिली जाते किंवा त्यांची प्रोसेस दाखवली जाते.
