एक महिला डॉक्टर जिने नवजात बाळाचा जीव वाचवला आहे. जन्मानंतर या बाळाच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. मृतावस्थेतच ते होतं. माहितीनुसार रुग्णालयातील ऑक्सिजन मशीन फेल झाली. पण डॉक्टरने आशा सोडली नाही. तिने बाळाला जिवंत करण्यासाठी धडपड केली. त्याच्या पाठीवर थापा मारल्या, तोंडाने फुंक मारली आणि अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलंच. शेवटी चमत्कार झालाच. बाळाच्या शरीराची हालचाल झाली. बाळ जिवंत झालं. मृतावस्थेत जन्मलेल्या बाळाला डॉक्टरांनी फुंक मारून काही मिनिटांत जिवंत केलं आहे.
advertisement
बाळ जन्मताच घाबरली आई, दूध पाजायलाही नकार; म्हणाली, 'कचऱ्यात फेका', कारण ऐकून डॉक्टरही धक्क्यात
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डॉक्टरची बाळाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. बाळाच्या तोंडात तोंड घालून ती फुंक मारते. जणू आपले प्राण ती त्याच्यात फुंकते. जवळपास 7 मिनिटं ती असं करते. अखेर बाळ जिवंत होतं आणि त्या डॉक्टरकडे पाहून गोड हसू लागतं. हे दृश्य म्हणजे मनाला स्पर्श करणारं असं आहे.
डॉक्टरने केलेली ही प्रक्रिया म्हणजे सीपीआर आहे. याला माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात. या पद्धतीने डॉक्टरने बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली. त्याच्या पाठीवर चोळून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाळाचे प्राण वाचले.
सोशल वर्कर शमा परवीन यांनी आपल्या @ShamaParveen70 या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या महिला डॉक्टरचं नाव सुलेखा चौधरी आहे. हे दृश्य आग्रातील सरकारी रुग्णालयातील आहे. ही केस जुनी आहे पण त्याचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होतो आहे.
