TRENDING:

असं किसिंग की सगळे पाहतच राहिले! शपथविधी सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांचा हटके Kiss Video Viral

Last Updated:

Donald Trump kiss wife video : डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या सोहळ्यात त्यांचा पत्नी मेलानिया यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियांना सगळ्यांसमोर किस केलं आहे. पण त्यांच्या किस अंदाज मात्र खूप हटके आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेनालिया
डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेनालिया
advertisement

शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. शपथ घेण्यासाठी ट्रम्प संसदेत पोहोचले तेव्हा सर्व नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. याच दरम्यान, ट्रम्प यांनी मेलानिया किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेलानिया यांच्या मोठ्या हॅटमुळे त्यांना किस करता आला नाही. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानिया यांनी वेगळ्या पद्धतीनं किस केलं. त्यांचा किसिंगचा हा अंदाज सगळ्यांना आवडला आहे.

advertisement

अनेक गुन्हेगारी प्रकरणांतील शिक्षा आणि दोन वेळा महाभियोग होऊनही ट्रम्प यांनी सत्तेत दमदार पुनरागमन केलं आहे. हा शपथविधी 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच थंड हवामानामुळे संसदेत आयोजित करण्यात आला. ट्रम्प यांनी अब्राहम लिंकन यांच्या बायबलचा वापर करून शपथ घेतली. या सोहळ्यात JD वेंस यांनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

advertisement

मंगळावर मानव पाठवण्याचं वचन

शपथविधीनंतर ट्रम्प यांनी भाषणात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी अमेरिकन अंतराळवीरांना मंगळावर पाठवण्याचे आणि तिथे अमेरिकेचा ध्वज फडकवण्याचे वचन दिले. हे ऐकताच कॅमेरा एलन मस्क यांच्याकडे वळला. मस्क यांनी उत्साहाने 'थंब्स अप' दाखवले. हा क्षणही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या/Viral/
असं किसिंग की सगळे पाहतच राहिले! शपथविधी सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांचा हटके Kiss Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल