हा व्हिडिओ पाहिल्यावर सहज लक्षात येतं की संबंधित व्यक्ती नशेत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक बैल रस्त्यावरून जात असतो आणि अचानक तो माणूस त्याच्या वाटेत येतो. बैल काही क्षण थांबतो आणि नंतर जोरात त्याच्यावर धाव घेतो. तो माणूस थेट बैलाच्या शिंगावर चढतो आणि काही क्षणांतच त्याला जवळील नाल्यात फेकतो. हे एवढं सगळं पाहून एखाद्याला वाटेल की तो गंभीर जखमी झाला असेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो व्यक्ती काही क्षणात नाल्यातून उठतो आणि अगदी काहीच झालं नसल्यासारखा उभा राहतो.
advertisement
नाल्यातून बाहेर येताच, तो व्यक्ती कॅमेऱ्याकडे पाहतो आणि असं काही ऍक्शन करु पाहातो जणू काही त्यानेच सांडाला हरवलं, इतकंच नाही तर त्यानंतर तो सांडाच्या दिशेने हातवारे करत त्याला घालवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे सगळं जवळपास 55 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.
हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवरील @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “वो ऐसे खड़ा रहा जैसे कुछ हुआ ही न हो” असा कॅप्शन दिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 84 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर युजर्सनी मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.
कोणीतरी लिहिलं, “महेंद्र बाहुबलीच्या खानदानातला दिसतोय,” तर दुसऱ्याने लिहिलं, “देसी दारू का जलवा है बाबू भैय्या!” एकाने तर थेट लिहिलं, “दारू अंगात गेली आणि भीती बाहेर निघून गेली.”