चित्रकूट : एका महिलेच्या पोटातून 2 किलो केस निघाल्याच्या या घटनेने डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. उत्तरप्रदेशातील चित्रकूट येथील रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.
काय आहे संपूर्ण घटना -
चित्रकूट येथील जानकीकुंड रुग्णालयात ही घटना घडली. महोबा जिल्ह्यातील रहिवासी असलेली एका महिलेच्या ऑपरेशन दरम्यान, पोटातून दोन किलोपेक्षा जास्त केसाचा गुच्छा निघाला. हा सर्व प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
advertisement
महोबा जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला 25 वर्षांची आहे. तसेच तिना 3 मुलेही आहेत. महिला दुसऱ्यांदा गर्भवती झाली तेव्हा तिने केस खायला सुरुवात केली. महिलेची ही सवय इतकी वाढली की ती स्वत:चे केस खाण्यासोबतच तिने आपले केस खाण्यासोबतच दुसऱ्यांचे केसही विंचरुन खात होती. यामध्ये महिलेच्या पोटात केसांचा गुच्छा जमा झाला होता.
फक्त 4 तासांत तब्बल 3 हजार रुपयांची कमाई, इंजीनिअर तरुणाला नोकरी न मिळाल्याने घेतला अनोखा निर्णय
पोटाच्या आजाराकडे दुर्लक्ष -
महिलेची दुसरी डिलिव्हरीही झाली होती. यानंतर ती तिसऱ्यांदा आई बनली. काही वेळा त्यांचा पोटात त्रास होत होता. मात्र, तिच्या लक्षात आले नाही की, तिला तिच्या या सवयीचा मोठा त्रास होणार आहे. महिलेला जेव्हा जास्त त्रास होऊ लागला, तेव्हा तिने बांदा येथे आपला उपचार केला. मात्र, तरीही तिला आराम मिळाला नाही. याबाबत तिने केस खाण्याच्या वाईट सवयीबाबत डॉक्टरांनाही सांगितले नाही. मात्र, महिलेला त्रास वाढू लागल्याने तिने आपला उपचार चित्रकूट येथील जानकीकुंड रुग्णालयात केला.
याठिकाणी डॉक्टरांनी तिचे सिटी स्कॅन केले असता ती हैराण झाली. डॉक्टरांनी महिलेला जे काय खरं आहे, त्याबाबत सांगायला लावलं. यावेळी महिलेने शेवटी तिला केस खाण्याची वाईट सवय असल्याचे सांगितले. यानंतर जानकीकुंड रुग्णालयाच्या डॉक्टर निर्मला गिहानी यांनी सांगितले की, त्यांचे ऑपरेशन करुन तिच्या पोटातून दोन किलोपेक्षा जास्त प्रमाणातील केसांचा गुच्छ बाहेर काढून तिचा जीव वाचवला.
तुमची मुलं नक्की यशस्वी होणार, फक्त सर्वात आधी करा हे काम, नक्षत्रांशी आहे संबंध
डॉक्टरांनी दिली ही माहिती -
याप्रकरणात जानकीकुंड रुग्णालयाच्या डॉक्टर निर्मला गिहानि यांनी सांगितले की, या प्रकारच्या घटना 1 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात पाहिल्या गेल्या आहेत. कमी वयाच्या महिला किंवा मानसिक रुग्ण असलेल्या महिला असे करतात. मी माझ्या आयुष्यात अशाप्रकारच्या तीन घटना पाहिल्या आहेत. एका घटनेत 9 वर्षांचा मुलगा, दुसऱ्या घटनेत 18 वर्षांची मुलगी होती आणि तिसऱ्या घटनेत 25 वर्षांची तरुणी होती.
या महिलेने दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यावर केस खाणे सुरू केले होते. तसेच जेव्हा बाळ व्हायचे तेव्हा केस खाणे बंद करायची. जेव्हा तिला वेदना जाणवू लागल्या तेव्हा तिने उपचार केले आणि अल्ट्रासाऊंडसाठी देखील ती आली नाही. सीटी स्कॅनमधून हा प्रकार उघडकीस आला. आता महिला पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असेही तिने सांगितले.