तुमची मुलं नक्की यशस्वी होणार, फक्त सर्वात आधी करा हे काम, नक्षत्रांशी आहे संबंध
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
मुलांच्या जन्मानंतर तारीख आणि वेळेनुसार, कुंडली तयार होते. अशावेळी ज्योतिषी किंवा पंडितजी ग्रह-नक्षत्रांच्या आधारावर जे अक्षर काढले जातात, त्यांच्यावरच मुलांचे नाव ठेवणे, शुभ मानले जाते.
ऋतू राज, प्रतिनिधी
मुजफ्फरपुर : आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी, तसेच लहानपणापासूनच चांगले संस्कार आत्मसात करावेत आणि पुढे आपल्या कुटुंबाचा गौरव व्हावा आणि एक महान म्हणून ते घडावेत, असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न आहे. सध्याची परिस्थिती पाहता, अनेक लोक ट्रेंड आणि सर्वात वेगळे दिसण्यासाठी आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवतात. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, मुलांच्या जन्मानंतर तारीख आणि वेळेनुसार, कुंडली तयार होते. अशावेळी ज्योतिषी किंवा पंडितजी ग्रह-नक्षत्रांच्या आधारावर जे अक्षर काढले जातात, त्यांच्यावरच मुलांचे नाव ठेवणे, शुभ मानले जाते.
advertisement
फक्त 4 तासांत तब्बल 3 हजार रुपयांची कमाई, इंजीनिअर तरुणाला नोकरी न मिळाल्याने घेतला अनोखा निर्णय
ज्योतिषी सल्लागार आलोक कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मुलांचे नाव नेहमी असे असावे की, ज्याचा अर्थ असावा. कारण याचा प्रभाव त्याच्या व्यक्तीत्वावर पडतो. सोबतच या गोष्टीचीही काळजी घ्यावी, कुठलेही हास्यास्पद नाव ठेऊ नये. नाव असे असावे की, ज्या उच्चार करताना सोपे जावे. यासाठी खाली नक्षत्रांसोबत अक्षरांच्या नावांची यादी देण्यात आली आहे.
advertisement
यामध्ये नामकरण करण्याच्या आधी पाहावे की, त्यांच्या नक्षत्रात कोणते अक्षर आहे. सम आणि विषम संख्येला लक्षात ठेवावे आणि मग त्या आधारावर आपल्या मुलांचे नामकरण करावे. हे त्यांच्यासाठी शुभ असेल तसेच ते त्यांच्या आयुष्यात भरपूर प्रगती करतील.
नक्षत्र आणि त्यांच्या अक्षरांची यादी -
advertisement
- अश्विनि नक्षत्र:- चू, चे, चो, ला, भरणी नक्षत्र:-ला, ली, लू, ले, लो
- कृतिका नक्षत्र:- आ,ई, ऊ, ए, रोहिणी नक्षत्र:- ओ, वा, वी, वू
- मृगशिरा नक्षत्र:- वे, वो,का, की, आर्द्रा नक्षत्र:- कू, घ, ङ, छ
- पुनर्वसु नक्षत्र:- के, को, हा, ही, पुष्य नक्षत्र:- हू, हे, हो, डा
- अश्लेषा नक्षत्र:- डी, डू, डे, डो, मघा नक्षत्र:- मा, मी, मू, मे
- पूर्वाफाल्गुनी नक्षत्र:- मो, टा, टी, टू,
- उत्तराफाल्गुनी नक्षत्र:- टे,टो,पा,पी,
- हस्त नक्षत्र:- पू, ष, ण, ठ, चित्रा नक्षत्र:- पे,पो, रा,री
- चित्रा नक्षत्र:- पे,पो, रा,री, स्वाती नक्षत्र:- रू, रे, रो, ता
- विशाखा नक्षत्र:- ती, तू, ते, तो, अनुराधा नक्षत्र:- ना, नी, नू, ने
- ज्येष्ठा नक्षत्र:- नो, या, यी, यू, मूल नक्षत्र:- ये, यो, भा, भी
- पूर्वाषाढ़ा नक्षत्र:- भू, धा, फा, ढा, उत्तराषाढ़ा नक्षत्र:- भे,भो, जा, जी
- श्रवण नक्षत्र:- खी, खू, खे, खो, धनिष्ठा नक्षत्र:- गा, गी, गू, गे
- शतभिषा नक्षत्र:- गो, सा, सी, सू, पूर्वाभाद्रपद नक्षत्र:- से, सो, दा, दी
- उत्तराभाद्रपद नक्षत्र:- दू, थ, झ, ण, रेवती नक्षत्र:- दे, दो, चा, ची
advertisement
Location :
Bihar
First Published :
May 29, 2024 12:07 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमची मुलं नक्की यशस्वी होणार, फक्त सर्वात आधी करा हे काम, नक्षत्रांशी आहे संबंध