मुंबईतील ही धक्कादायक घटना आहे. 78 वर्षांचा वृद्ध दातांना कॅप लावण्यासाठी डेंटिस्टकडे गेला. दातावर कॅप बसवताना उपचारादरम्यान ती त्याच्या घशात गेली. व्यक्तीला भूल दिलेली होती, घसा सुन्न होता. त्यामुळे त्याला तात्काळ त्रास जाणवला नाही. पण काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. म्हणून लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा कॅप फुफ्फुसात अडकल्याचं आढळलं. कॅप श्वासनलिकेतून उजव्या फुप्फुसाच्या वायूमार्गात गेली होती.
advertisement
रुग्णावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर ब्रोन्कोस्कोपी करण्यात आली. डॉक्टरांनी फक्त 10 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण केली. 10 मिनिटांत त्याच्या फुफ्फुसात अडकलेली कॅप बाहेर राढण्यात आली. सुदैवाने त्याच्या फुप्फुसांना कोणतीही दुखापत किंवा संसर्ग झाला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला.
