आई मुलांपासून दूर जाताच त्यांनी किचनमध्ये जे थैमान घातलं आणि स्वतःचा जो अवतार बनवला ते पाहून तुम्हीही कोणीही डोक्यावर हात मारेल. सध्या या मुलांच्या खट्याळ पणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुले किचनमध्ये पीठ खेळत आहेत. आईला किचनमध्ये जाताच तिला मोठा धक्काच बसला. तिनं लगेच लहान मुलांच्या करामतीचा व्हिडीओ बनवला. लहान मुले पीठासोबत खेळत असून संपूर्ण किचनमध्ये त्यांनी पीठ सांडवलंय. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःलाही पूर्ण पीठात अंघोळ घातली. त्यांचा हा अवतार, कारनामा पाहून तुम्हासाही हसू आवरणार नाही.
advertisement
okewt_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंटही पहायला मिळत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे तर भरपूर मजेशीर, विचित्र, व्हिडीओ चर्चेत येत असतात. त्यांचा अजब कारनामा लोकांना त्यांच्या प्रेमात पाडतो. यापूर्वीही लहान मुलांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
