TRENDING:

तुम्ही पण करता ChatGPT चा वापर? मग सावधान! तो तुम्हाला मुर्ख बनवू शकतो, समोर आला धक्कादायक रिसर्च

Last Updated:

ChatGPT सारख्या AI टूल्समुळे अनेक मोठी किंवा जास्त वेळ खाऊ कामं आता काही मिनिटांत पूर्ण होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. विशेषतः ChatGPT सारख्या AI टूल्समुळे अनेक मोठी किंवा जास्त वेळ खाऊ कामं आता काही मिनिटांत पूर्ण होऊ शकतात. मात्र या सोयीमुळे माणसाचं मेंदूचं कार्य क्षीण होत असल्याचं एक धक्कादायक संशोधन समोर आलं आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

AI वापरणं तुमचं विचार करण्याचं सामर्थ्य कमी करतंय?

MIT (Massachusetts Institute of Technology) च्या मीडिया लॅबने केलेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, निबंध लेखनासाठी ChatGPT आणि इतर AI टूल्सवर अवलंबून असलेले विद्यार्थी आणि स्वत:हून निबंध लिहेलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी तुलना केली, तेव्हा त्यांना आढळले की AI टूल्स वापरणारे लोक गरजेपेक्षा कमी मेंदूवापर करत होते.

advertisement

संशोधनाची पद्धत काय होती?

MIT च्या या संशोधनात ५४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांना निबंध लिहिण्याचं काम देण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विद्युत क्रियाचं निरीक्षण करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये विभागण्यात आलं:

एक गट जो फक्त ChatGPT चा वापर करत होता

दुसरा गट जो Google वापरत होता

तिसरा गट जो कोणतीही बाह्य मदत न घेता लिहित होता

advertisement

चार महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांचं पुनःमूल्यांकन करण्यात आलं.

AI चा वापर करणाऱ्या गटाने पहिल्या टप्प्यावर चांगलं काम केलं असलं, तरी चार महिन्यांनंतर त्यांच्या मेंदूच्या क्रियेत घट आढळून आली. विशेष म्हणजे, या गटातील विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या निबंधातील संदर्भ आठवत नव्हते, कारण ते पूर्णतः AI जनरेटेड होते.

ज्यांनी स्वतःचा विचार करून निबंध लिहिला, त्यांच्या मेंदूतील हालचाल सर्वाधिक सक्रिय होती. EEG स्कॅनिंगने हे स्पष्ट केलं की त्यांचं मेंदू अधिक कार्यशील होता आणि त्यांनी त्यांच्या लेखनात स्वतःचे विचार वापरले होते.

advertisement

संशोधकांनी सांगितलं की, AI वापरणं पूर्णपणे चुकीचं नाही. पण त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहिल्यास आपली विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता कमी होण्याचा धोका आहे.

मराठी बातम्या/Viral/
तुम्ही पण करता ChatGPT चा वापर? मग सावधान! तो तुम्हाला मुर्ख बनवू शकतो, समोर आला धक्कादायक रिसर्च
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल