फर्रुखाबाद : वाढते प्रदूषण आणि महागाईमुळे प्रत्येकजण त्रासला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून अनेक जण इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी बनवण्यासाठी आणि आणि त्या दररोज चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचे उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तर पेट्रोल डिझेलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व समस्यांवर एका शेतकऱ्याने उपाय शोधत एक अनोखी बाइक बनवली आहे.
advertisement
श्रीकांत असे या शेतकऱ्याचे नाव आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जुनी दुचाकी, भंगार आणि काही नवीन पार्ट जोडून ही इलेक्ट्रॉनिक बाइक 10 रुपयांच्या खर्चावर 50 किमी चालते. 16 वर्षे जुन्या पेट्रोल बाइकला या शेतकऱ्याने इलेक्ट्रॉनिक बाइकमध्ये बदलले. यासाठी त्यांना 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च आहे.
त्यांनी ई-बाइक तयार करण्यासाठी भंगारातून काही साहित्य घेतले. त्यानंतर काही पार्ट्स ऑनलाइन मागवले. यानंतर मोठ्या मेकॅनिककडून शिकून घेत त्यांचा सल्लाही घेतला आणि मग त्यावर काम सुरू केले. 10 ते 15 दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांनी ही इलेक्ट्रॉनिक बाइक तयार केली. पेट्रोल इंजिन काढून त्यांनी त्या जागेवर 60 व्होल्टची एक बॅटरी, 30 हजार एमएचची ठेवली आहे. तर मागच्या चाकात 1 हजार व्हॅटची हब मोटरही लावली आहे, असे त्यांनी सांगितले.
17 वर्षांच्या मुलाचं निधन, बापानं दिली अनोखी श्रद्धांजली, हाती घेतलेल्या 'या' मिशनचं होतंय कौतुक
श्रीकांत हे शेती करतात. तसेच पिठाची गिरणीही चालवतात. ते म्हणाले त्यांच्याजवळ 16 वर्षे जुनी पेट्रोल दुचाकी होती. एकदा त्यांना एका दुचाकीतून धूर निघत असल्याचे दिसले. तसेच त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांना ही ई-बाइक बनवण्याची कल्पना सुचली.
श्रीकांत यांनी दावा केला आहे की, एकदा बॅटरीला चार्ज करण्यासाठी दीड यूनिट वीज लागते. म्हणजे 10 रुपये खर्च होतात. मात्र, त्यानंतर ही बाइक 50 किमी प्रतितास या वेगाने 50 किमीपेक्षा जास्त चालते. पेट्रोलवर चालणारी बाइक 1 लीटर पेट्रोलवर 50 ते 60 किमी प्रवास करतात, ज्याची किंमत सुमारे 108 रुपये आहे. अशा परिस्थितीत त्यांनी बनवलेली बाइक फायदेशीर आहे, असे म्हणाले.
या बाइक दोन ते तीन जण सामानासह आरामात बसू शकतात. यामुळे कुठलेही प्रदूषण होत नाही. तसेच जास्त आवाजही येत नाही. त्यांनी तयार केलेल्या या बाइकची सर्वत्र चर्चा होत असून आता अनेक जण त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
