17 वर्षांच्या मुलाचं निधन, बापानं दिली अनोखी श्रद्धांजली, हाती घेतलेल्या 'या' मिशनचं होतंय कौतुक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
unique tribute to son - सिव्हिल इंजीनिअर मुनुसामी यांच्याशी संबंधित ही घटना आहे. त्यांचा सर्वात लहान मुलगा इसैयमुदु याचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या या निधनानंतर मुनुसामी यांनी निसर्गाच्या सानिध्यात शांती शोधण्याचा प्रयत्न करत आपल्या मुलाला अनोखी श्रद्धांजली दिली.
रानीपेट : आयुष्य हे अनपेक्षित आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे काही वेळा अनपेक्षित असे दु:ख व्यक्तीच्या जीवनात येते. अशीच एक दुर्दैवी घटना एका व्यक्तीच्या जीवनात घडली होती. एका व्यक्तीच्या मुलाचे दुर्दैवी निधन झाले. मात्र, त्यांनी आपल्या मुलाला अत्यंत अनोख्या स्वरुपात श्रद्धांजली अर्पित केली.
तामिळनाडू येथील रानीपेट जिल्ह्याच्या वलाजापेटजवळ विलवनाथपुरम येथील ही घटना आहे. येथील सिव्हिल इंजीनिअर मुनुसामी यांच्याशी संबंधित ही घटना आहे. त्यांचा सर्वात लहान मुलगा इसैयमुदु याचे दुर्दैवी निधन झाले. त्याच्या या निधनानंतर मुनुसामी यांनी निसर्गाच्या सानिध्यात शांती शोधण्याचा प्रयत्न करत आपल्या मुलाला अनोखी श्रद्धांजली दिली. त्यांनी एक मिशन हाती घेत तब्बल 3 हजार पेक्षा अधिक झाडे लावली.
advertisement
नेमकं काय घडलं होतं -
मुनुसामी हे त्यांची पत्नी कौसलई आणि परुंदगई, इसैयमुदु या आपल्या दोन मुलांसोबत आनंदात जीवन जगत होते. मात्र, त्यांचा 17 वर्षी मुलगा इसैयमुदु याचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मोठा आघात झाला. मात्र, त्यांनी या दु:खावर मात करत आपल्या मुलाला अत्यंत अनोख्या प्रकारची श्रद्धांजली दिली.
त्यांनी आपल्या काही मित्रांच्या सल्ल्यावरुन आपल्या मुलाच्या आठवणीत आपल्या गावाजवळच्या कांचना गिरी टेकडीवर वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रत्येक रोप हे आपल्या मुलाला समर्पित केले. या वृक्षांची देखभाल करत असताना त्यांच्या मनाला शांती मिळाली आणि लवकरच हे काम एका मिशनमध्ये बदलले.
advertisement
3 हजार पेक्षा जास्त झाडांची लागवड -
2022 मध्ये मुनुसामी यांनी केटी हिल परिसरात जवळपास 3400 झाडे लावली आणि एकप्रकारे त्या रोपांना पाणी देणे, त्यांची देखभाल करणे हे त्यांचे डेली रुटीन बनले. विलवनाथपुरम ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांनी या झाडांसाठी पाण्याची पाइपलाइन केली आणि पाण्याची टाकीही उभारली. तसेच मित्राच्या मदतीने काही लोकांना सोबत घेत त्यांनी त्यांनी 15 पेक्षा जास्त प्रकारचे वड, अंजीर आणि शाही झाडे (रॉयल ट्री) लावली आहेत. त्यांचा या उपक्रमाची सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Location :
Tamil Nadu
First Published :
October 27, 2024 12:40 PM IST
मराठी बातम्या/Viral/
17 वर्षांच्या मुलाचं निधन, बापानं दिली अनोखी श्रद्धांजली, हाती घेतलेल्या 'या' मिशनचं होतंय कौतुक