7 मुलांची आई घरातून अचानक गायब, सर्वत्र खळबळ, गावकरी म्हणाले...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - 7 मुलांची आई असलेली 40 वर्षीय महिला आपल्या घरातून संशयास्पद पद्धतीने गायब झाली. यानंतर आता तिची 2 वर्षांची मुलगी आपल्या आईसाठी रडत आहे. तर तिची इतर लहान मुले आपल्या आईची वाट पाहत आहे.
अंजली शर्मा, प्रतिनिधी
कन्नौज - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या आणि बलात्काराच्याही घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यासोबत विवाहबाह्य संबंधांच्याही घटना समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 7 मुलांची आई असलेली 40 वर्षीय महिला आपल्या घरातून संशयास्पद पद्धतीने गायब झाली.
काय आहे संपूर्ण घटना
ही घटना कन्नौज जिल्ह्याच्या गुरसहायगंज याठिकाणी पाहायला मिळाली. गुरसहायगंज क्षेत्रातील 7 मुलांची आई असलेली 40 वर्षीय महिला आपल्या घरातून संशयास्पद पद्धतीने गायब झाली. यानंतर आता तिची 2 वर्षांची मुलगी आपल्या आईसाठी रडत आहे. तर तिची इतर लहान मुले आपल्या आईची वाट पाहत आहे. या सर्वांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी या प्रकरणी महिला हरवल्याची तक्रार नोंदवून कारवाई सुरू केली आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकरणी महिलेच्या दिराने तक्रार करत म्हटले की, गावातील एका महिलेने तिला चुकीच्या कामात आमिष देऊन कुणासोबत तरी पाठवले आहे. तर स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, महिला आधीही एकदा अशाच पद्धतीने घरातून एका तरुणासोबत निघून गेली होती. महिलेचे कुणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू होते. यावेळीही ही महिला प्रेमप्रसंगातून त्याच तरुणासोबत कुठेतरी निघून गेली आहे. महिलेचा पती हा बाहेरच्या राज्यात खासगी ठिकाणी नोकरी करतो.
advertisement
याबाबत गुरसहायगंज पोलिसांनी म्हटले की, एक 40 वर्षी महिला घरातून कुठेतरी निघून गेल्याची तक्रार मिळाली आहे. या महिलेला 7 मुले आहेत. तसेच महिलेच्या कुटुंबीयांच्या वतीने एक महिलेवर आरोपही लावण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
Location :
Kannauj,Uttar Pradesh
First Published :
October 25, 2024 8:47 PM IST