व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक मुलगा आणि मुलगी जे भाऊबहीण आहेत. दोघंही एकमेकांसोबत बसले आहेत. त्यांच्या मागे एक व्यक्ती आहे, जी या मुलांचे वडिल आहेत. वडिलांनी मुलाला आयफोन गिफ्ट केला आहे. मुलगा ते आनंदाने तो बॉक्स उघडतो. मुलगीही उत्सुकतेने आपल्या वडिलांनी आपल्या भावाला दिलेला आयफोन पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण तरी कुठेतरी वडिलांनी आपल्याला काहीच न दिल्याची निराशाही या हसूत दिसते.
advertisement
मुलगा आणि मुलगी असा भेदही आजही बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतो. कितीही म्हटलं तरी मुलांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात. मुलगी म्हणून तिला नाही. या व्हिडीओतही आपल्याला तेच दिसून येतं. त्यामुळे सुरुवातीला व्हिडीओ पाहिल्यावर आपल्याला खूप राग येतो. पण शेवटी मात्र एक अनपेक्षित ट्विस्ट आहे. जो पाहून ज्या वडिलांचा तुम्ही सुरुवातीला रागराग कराल, त्यांचंच कौतुक कराल आणि त्यांना सॅल्युटही कराल.
पुढे तुम्ही पाहाल तर ज्यावेळी मुलगी आपल्या वडिलांनी भावाला दिलेला आयफोन पाहण्यात मग्न असते तेव्हा मुलीचं लक्ष नसताना मुलीचे वडील तिच्याही पुढ्यातही आयफोन ठेवतात. काही वेळाने मुलीचं लक्ष तिथं जातं आणि तिच्या आनंदाला पारावर उरत नाही. वडिलांकडे ती पाहते, वडीलही तिच्याकडे पाहून हसतात. तिच्या डोळ्यात पाणीही दाटून येतं.
घटस्फोटित महिलेशी लग्न, काही दिवसांत गायब झाली बायको, सत्य समजताच नवरा धक्क्यात
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण सोशल मीडियावर तुपान व्हायरल होतो आहे. @qubixnews इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो पोस्ट करण्यात आला आहे.