TRENDING:

वडील भावाशी लग्न लावत होते, तरुणी घरातून पळाली आणि थेट देशाच्या सेवेत दाखल!

Last Updated:

पालक मुलांचे हट्ट पुरवतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. मात्र अनेकदा पालकच आपल्या मुलांवर काही निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे मुलांनाही त्रासाचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा काही चुकीचे निर्णयही पालक घेत असतात ज्यामुळे मुलांचं आयुष्यच बदलून जातं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : पालक मुलांचे हट्ट पुरवतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. मात्र अनेकदा पालकच आपल्या मुलांवर काही निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे मुलांनाही त्रासाचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा काही चुकीचे निर्णयही पालक घेत असतात ज्यामुळे मुलांचं आयुष्यच बदलून जातं. असाच काही प्रकार 19 वर्षीय मुलीसोबत घडला. तिनं पालकांच्या विरोधाच जाऊन निर्णय घेत असं काही करुन दाखवलं की सर्वांनाच तिचं कौतुक वाटतंय. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
तरुणी घरातून पळाली आणि थेट देशाच्या सेवेत दाखल!
तरुणी घरातून पळाली आणि थेट देशाच्या सेवेत दाखल!
advertisement

23 वर्षांची हमना जफर 19 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिचं लग्न तिच्या चुलत भावाशीच लावण्याचं ठरवलं. लग्नाची तयारीही झाली होती. पण हमानाला हा निर्णय योग्य वाटला नाही. तिला स्वतःच्या अटींवर जगायचं होतं. शेवटी एक दिवस ती घरातून पळून गेली. संघर्षांचा सामना केला आणि आज ती अमेरिकन सैन्याची योद्धा आहे. तिची ही प्रेरणादायी कहानी चांगलीच चर्चेत आलीय.

advertisement

पृथ्वीवरील या 6 ठिकाणी सूर्यास्त होत नाही, दिवस-रात्र सूर्य चकाकत राहतो!

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हमना जफरचे आई-वडील अमेरिकेतील मेरीलँडमध्ये राहत होते, परंतु ते कधीही अमेरिकन संस्कृती स्वीकारू शकले नाहीत. हमना त्याच शाळेत शिकली होती, त्यामुळे तिला स्वतःच्या आवडीचं आयुष्य जगायचं होतं. या अमेरिकन स्वप्नाची तिला मोठी किंमत चुकवावी लागली. एके दिवशी तिचे आई-वडील म्हणाले, आपल्याला पाकिस्तानला जायचे आहे. हमनाही दागिने आणि ड्रेस घालून तयार झाली आणि पाकिस्तानला पोहोचली. पण तिथं तिचं एंगेजमेंट झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

advertisement

हमनाला हा निर्णय मान्य नव्हता. तिला लष्कराच्या अधिकाऱ्याची मदत मिळाली. हमनाने बरेच दिवस हॉटेलमध्ये राहून काढले. दरम्यान, कोविड लॉकडाऊन आला. हमनाला वाटलं की तिला आता घरी जावं लागेल. पण नंतर क्लॉडिया बॅरेरा या मैत्रिणीने तिला मदत केली. तिला घरी नेले. क्लॉडिया आणि तिचा नवरा हमनाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. अखेरीस हमना अमेरिकन हवाई दलात दाखल झाली.

advertisement

क्लॉडिया म्हणाली, हमनाची खूप प्रबळ इच्छाशक्ती आहे. जफरची इच्छा आहे की तिच्या कुटुंबाने तिची क्षमता पाहावी आणि त्यांना तिचा अभिमान वाटावा, परंतु त्यांच्याशी संपर्क करण्याचा अनेक प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे अजूनही क्लॉडियाचे कुटुंब आहे, जे तिला मुलीसारखं वागवतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, जगात अशा अनेक मुली, मुलं आहेत ज्यांना आपल्या पालकांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र दुसरीकडे काहींमध्ये धाडस आणि कोणाची साथ नसल्यामुळे ते पालकांच्या त्या निर्णयाला स्विकारतात आणि तसंच आयुष्य जगतात. त्यामुळे अनेक मुली आणि मुलांसाठी हमना एक प्रेरणा ठरु शकते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
वडील भावाशी लग्न लावत होते, तरुणी घरातून पळाली आणि थेट देशाच्या सेवेत दाखल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल