दोन शाळकरी मुली एकमेकींचे केस ओढत WWE प्रमाणे फाईट करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्या दोघी ज्या प्रकारे भांडत आहेत ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेचा गणवेश घातलेल्या दोन विद्यार्थिनी जोरदार भांडत आहे. एकमेकींचे, कपडे ओढत त्यांची हाणामारी सुरु आहे. आजूबाजूला विद्यार्थांची गर्दी जमली आहे. काहींनी पुढाकार घेत त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या काही थांबायलाच तयार नाही. शेवटपर्यंत त्या एकमेकींना मारत राहिल्या.
advertisement
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 32 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत. असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर सतत व्हायरल होत असतात. रस्त्यावर अनेक भांडणं होत असतात आणि त्यांचे व्हिडीओही समोर येतात.
