TRENDING:

मच्छीमाराचं चमकलं नशीब! समुद्रात फेकलं जाळं अन् हाती 'बाहुबली मासा', लिलावात मिळाले 'इतके' कोटी

Last Updated:

जपानमध्ये 276 किलो वजनाचा बाहुबली टुना मासा मासेमारांनी पकडला. टोकियोच्या बाजारात लिलावादरम्यान Michelin-star रेस्टॉरंटने 11 कोटी रुपये मोजले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कधी आणि कोणाचे नशीब कसे चमकेल हे कोणीच सांगू शकत नाही. देवाची कृपा झाल्यास कोणी रातोरात करोडपती होतो, तर कोणाचे करोडो रुपये पाण्यात जातात. कधी कोणाला घरात लपलेला खजिना सापडतो, तर कधी कोणाला लॉटरी लागते. समुद्रात अशा घटना अनेकदा पाहायला मिळतात. कधी कोणाला व्हेलची उलटी (whale vomit) सापडते, तर कधी दुर्मिळ मासा.
News18
News18
advertisement

अशीच एक घटना जपानमध्ये उघडकीस आली आहे. तेथील मच्छिमारांनी समुद्रात जाळे टाकले असता त्यांना एक 'बाहुबली' ट्यूना मासा (tuna fish) मिळाला. त्याला बाहेर काढण्यासाठी मच्छिमारांना खूप घाम गाळावा लागला, कारण त्याचे वजन 276 किलो होते. जेव्हा त्याचा लिलाव करण्यात आला, तेव्हा एका Michelin-star सुशी रेस्टॉरंटने (sushi restaurant) मागितलेल्या किमतीत तो खरेदी केला. महाकाय ब्लूफिन ट्यूना (bluefin tuna) प्रचंड किमतीत विकला गेल्याने व्हायरल झाला आहे.

advertisement

साधारणतः या ट्यूना माशापासून सुशी बनवली जाते. बाजारात या माशाची किंमत 200 रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत, जर या बाहुबली ट्यूनाची किंमत अंदाजित केली, तर तो 55 हजारात विकला गेला असता. पण त्याने सगळे रेकॉर्ड तोडले आणि मच्छिमारांचे नशीब रातोरात चमकले. खरं तर, मच्छिमारांनी हा ट्यूना मासा लिलावासाठी टोकियोच्या टोयोसू फिश मार्केटमध्ये (Toyosu Fish Market) नेला.

advertisement

सुरुवातीची बोली 10 लाख रुपयांपासून सुरू झाली. पण त्याची बोली वाढतच गेली. अशा प्रकारे, Michelin-star सुशी रेस्टॉरंट ओनोडेरा ग्रुपने (Onodera Group) या ट्यूनासाठी 207 दशलक्ष येन (11 कोटी रुपये) एवढी मोठी किंमत मोजली. उल्लेखनीय आहे की, या ग्रुपने गेल्या वर्षी टॉप ट्यूनासाठी 114 दशलक्ष येन (6 कोटी 17 लाख) खर्च केले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, यापूर्वी, सर्वात महागडा ट्यूना मासा 1999 मध्ये टोकियोमध्ये विकला गेला होता. त्यानंतर हा दुसरा सर्वात महागडा मासा ठरला आहे.

advertisement

हे ही वाचा : General Knowledge : अशी कोणती गोष्ट आहे जी रात्री पांढरी, संध्याकाळी निळी, दुपारी काळी आणि सकाळी हिरवी दिसते?

हे ही वाचा : लग्नात दारू आणि डीजे नसेल तर मिळणार चक्क 21,000 रुपये, कुठे झाला निर्णय?

मराठी बातम्या/Viral/
मच्छीमाराचं चमकलं नशीब! समुद्रात फेकलं जाळं अन् हाती 'बाहुबली मासा', लिलावात मिळाले 'इतके' कोटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल