TRENDING:

VIDEO : धावत्या बसचा अचानक तुटला पत्रा अन् महिला रस्त्यावरच पडली, चेन्नईतील धक्कादायक घटना

Last Updated:

रस्त्यांवर भरधाव गाड्यांसोबत अनेक धक्कादयक घटना घडत असतात. अचानक कधी, कसा अपघात घडेल सांगू शकत नाही. अशा अपघातांच्या अनेक भीषण घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस असे अपघात वाढत चाललेले पहायला मिळत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : रस्त्यांवर भरधाव गाड्यांसोबत अनेक धक्कादयक घटना घडत असतात. अचानक कधी, कसा अपघात घडेल सांगू शकत नाही. अशा अपघातांच्या अनेक भीषण घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस असे अपघात वाढत चाललेले पहायला मिळत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर चालताना, गाडी चालवताना सतर्क राहण्यास सांगितलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एक महिला अचानकपणे बसमधून खाली पडते. या घटनेनं एकच खळबळ उडवली आहे.
धावत्या बसचा अचानक तुटला पत्रा
धावत्या बसचा अचानक तुटला पत्रा
advertisement

चेन्नईमधून ही धक्कादायक घटना समोर आलीय. धावत्या बसचा अचानक पत्रा तुटला आणि महिला बसमधून खाली कोसळली. सरकारी बससोबत घडलेला हा अपघात पाहून लोक घाबरले आहेत. घटनास्थळी भरपूर गर्दी पहायला मिळाली.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सरकारी बस आहे आणि बसच्या आजूबाजूने भरपूर गर्दी आहे. चेन्नईमध्ये बस धावत असताना अचानकपणे प्रवासी सीटखालील मजला तुटला. उतरण्यासाठी उभी असलेली महिला रस्त्यावर पडली. या महिलेला लगेच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवानं महिलेला गंभीर दुखापत झाली नाही.

advertisement

advertisement

@BJP_Trends च्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 10 सेकंदांच्या या व्हिडीओनं चांगलीच खळबळ उडवली आहे. तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनीही या अपघाताबाबत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

मराठी बातम्या/Viral/
VIDEO : धावत्या बसचा अचानक तुटला पत्रा अन् महिला रस्त्यावरच पडली, चेन्नईतील धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल