कुटुंब किंवा मित्रांसोबत राहताना नाश्ता, जेवण झाल्यानंतर भांडी कोण घासणार हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तसं पाहायला गेलं तर बहुतेक घरात त्या घरातील महिलाच भांडी घासताना दिसतील. तर काही कुटुंब किंवा मित्रपरिवारात भांडी घासायचे दिवस वाटून घेतलेले असतात. म्हणजे आज तू भांडी घासायची उद्या तू. किंवा सकाळची तू आणि रात्रीची तू, असं. तर मजा म्हणून काही ठिकाणी चिठ्ठ्याही पाडल्या जात असतील. पण एका व्यक्तीने ही समस्या चॅटजीपीटीच्या मदतीने सोडवली.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका रूममध्ये बरेच पुरुष बसले आहेत. एक पुरुष ज्याच्या हातात मोबाईल आहे, तो फोनवर बोलताना दिसतो. तो चॅटजीपीटीला विचारतो की आम्ही सगळेजण जेवलो आहोत आता भांडी कुणी घासायची सांगा. त्यानंतर तो रूममध्ये असलेल्या सगळ्यांची नावं घेतो. जावेद, गुड्डू, सदरा भाई, जुबैर आणि मुहम्मद लाला. यापैकी कुणी भांडी घासावीत, असं चॅटजीपीटीला वाटतं, असं तो विचारतो.
आता या प्रश्नावर चॅटजीपीटी काय उत्तर देईल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्या सगळ्यांना आहेच पण सोबतच आपल्यालाही. चॅटजीपीटीचं उत्तर ऐकून सगळे हसायला लागतात. चॅटजीपीटी एका व्यक्तीचं नाव घेते जावेदभाई आणि त्या व्यक्तीने भांडी घासावीत असं सांगते. झालं तर मग हेच फायनल चॅटजीपीटीच्या मदतीने कोणत्याही वादाशिवाय भांडी कुणी घासायची हे ठरलं. चॅटजीपीटीच्या उत्तराने मग सगळे हसू लागतात.
@ab_aesthetic07 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये 'पाकिस्तानात ChatGpt परिपूर्ण वापर', असं लिहिलं आहे. या वरून हा व्हिडीओ पाकिस्तानाचा आहे, असं सांगितलं जात आहे.
'काजू' हरवलाय! शोधणाऱ्याला 10000 मिळणार, जागोजागी लागलेत पोस्टर्स
हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. "भारतात आम्ही रेसिपी मागतो आणि पाकिस्तानात एआयचा हा वापर पहा", अशी कमेंट एका युझरने केली आहेत. तर दुसऱ्याने "आता मी घरी प्रयत्न करेन, मी माझ्या पत्नीला चॅटजीपीटीला विचारायला सांगेन", असं म्हटलं आहे.
