या लग्नाचा व्हिडिओ वेडिंग कोरिओग्राफर आकांक्षाने तिच्या @aka_naach या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत 8.8 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही नवरदेव शेरवानी घालून आणि पारंपरिक भारतीय लग्नाप्रमाणे घोड्यावर स्वार झालेले दिसत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र ढोल-ताशांच्या तालावर नाचत आहेत आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.
कुटुंबीयांनी खुल्या मनाने स्वीकारलं
advertisement
व्हिडिओ शेअर करताना आकांक्षाने लिहिलं, "हे लग्न माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे! या लग्नाची ऐतिहासिक डबल वरात आणि विधी पाहून माझं मन भरून आलं. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आपले जुने विचार बाजूला ठेवून दोन्ही नवरदेवांना जसे आहेत तसे स्वीकारले, हे पाहून मला खूप आनंद झाला."
सोशल मीडियावर लोकांचं प्रेम
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि त्याला 1.12 लाखांहून अधिक लाईक्स आणि 6,500 हून अधिक कमेंट्स मिळाल्या. लोकांनी या अनोख्या लग्नावर प्रेमाचा वर्षाव केला. एका युजरने लिहिलं, "जगाला अधिक प्रेमाची गरज आहे, हे खरं प्रेम आहे." तर दुसऱ्या युजरने लिहिलं, "हे लग्न प्रेम आणि ऊर्जेने भरलेलं आहे, ते पाहून माझं मन आनंदाने भरून आलं." आणखी एका युजरने कमेंट केली, "गे असो वा नसो, जेव्हा दोन लोकं लग्न करतात, तेव्हा भांगडा, गोंधळ आणि कुटुंब एकत्र येतं, तेव्हा फक्त आनंद असतो."
हे ही वाचा : आता Boss नाही तर AI ठरवणार तुमचा पगार, नोकरी आणि इन्क्रिमेंटवर कसा परिणाम होणार?
हे ही वाचा : फाॅलोअर्ससाठी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला मारली कानाखाली, RPF ने युट्युबरला शिकवला धडा, पहा VIDEO