फाॅलोअर्ससाठी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला मारली कानाखाली, RPF ने युट्युबरला शिकवला धडा, पहा VIDEO

Last Updated:

बिहारच्या अनुग्रह नारायण मार्ग रेल्वे स्थानकावर एका यूट्यूबरने फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात अजब स्टंट केला. रेल्वे सुटत असताना एका प्रवाशाला त्याने थप्पड मारली आणि हा प्रकार त्याच्या मित्राने व्हिडिओमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर...

Bihar YouTuber viral video
Bihar YouTuber viral video
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी माणसं काहीही करतात. अशीच एक घटना बिहारमधील अनुग्रह नारायण मार्ग रेल्वे स्थानकावर घडली, जिथे एका युट्युबरने प्रसिद्ध होण्यासाठी चालत्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला कानाखाली मारली. जवळच उभ्या असलेल्या त्याच्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.
आरोपीला घेतलं ताब्यात
हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. लोकं सोशल मीडियावर याबद्दल चिंता व्यक्त करू लागले. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ट्रेन सुरू होताच युट्युबर हळूच ट्रेनजवळ जातो आणि आपत्कालीन खिडकीजवळ बसलेल्या व्यक्तीला कानाखाली मारतो. कानाखाली मारल्यानंतर तो काहीच घडलं नाही, अशा प्रकारे हसत चालत निघून जातो.
हा व्हायरल व्हिडिओ नंतर रेल्वे सुरक्षा दलापर्यंतही पोहोचला. कारवाई करत आरपीएफने युट्युबर आणि त्याच्या मित्राला अटक केली. आरपीएफने ही माहिती आपल्या सोशल मीडियावर टाकून लिहिलं की, आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाऊ शकत नाही.
advertisement
अटक झाल्यानंतर मागितली माफी
ताब्यात घेतल्यानंतर युट्युबरने माफी मागताना एक व्हिडिओ पोस्ट केला. युट्युबर म्हणतो, "मी एक युट्युबर आहे आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर माझ्या फॉलोअर्ससाठी व्हिडिओ पोस्ट करतो. फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने मी रेल्वे स्थानकावर आलो आणि चालत्या ट्रेनमध्ये एका प्रवाशाला कानाखाली मारली. मला माहीत आहे की, ही खूप मोठी चूक आहे आणि मी ती पुन्हा करणार नाही. कृपया मला माफ करा."
advertisement
advertisement
सोशल मीडियावर लोकांचा संताप
सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडिओवर आपला राग व्यक्त केला आहे. आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आपला राग व्यक्त करत एका युजरने लिहिलं की, आजकाल लोकांना काय झालं आहे. हा त्रास आहे. दुसऱ्या युजरने लिहिलं की, मला आनंद आहे की त्याला अटक करण्यात आली आहे. आता इतर लोकांसाठी हा चांगला धडा असेल.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
फाॅलोअर्ससाठी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला मारली कानाखाली, RPF ने युट्युबरला शिकवला धडा, पहा VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement