पत्नीला फोन करून बोलावलं, तिच्यासोबत आई आली, दोघी खोलीत जाताच दरवाजा केला बंद आणि पुढे...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हरियाणातील हिसार जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने पत्नी व सासूला जिवंत जाळले. आरोपी रमभगत याला पत्नीने नशामुक्ती केंद्रातून घरी आणले होते, मात्र तो वेगळ्या घरात राहत होता. रविवारी त्याने पत्नीला बोलावले आणि...
नात्यांचे धागे खूप नाजूक असतात. त्यामुळे ते खूप काळजीपूर्वक हाताळायला लागतात. किंचितशी चूकही अगदी घट्ट नातंही उद्ध्वस्त करू शकते. संपूर्ण घराचा पाया नवरा-बायकोच्या नात्यावर टिकून असतो. त्यामुळे दोघांनीही आपलं नातं जपून ठेवणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, जर नवराच विचित्र गोष्टी करत असेल, तर बिचाऱ्या पत्नीचं काय होईल? खरं तर, हरियाणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या आई आणि पत्नीला जिवंत जाळलं. इतकंच नाही, तर हा माणूस यावेळी घराबाहेर बसून किंकाळ्या ऐकत होता. रडण्याचे आणि आक्रोश करण्याचे आवाज ऐकूनही हा माणून निर्दयीपणे बाहेर बसून राहिला.
काय आहे प्रकरण?
ही घटना हिसार जिल्ह्यातील महाजत गावातील आहे. या ठिकाणचा रहिवासी रामभगत हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. तो अनेकदा दारूच्या नशेत आपल्या पत्नीला मारहाण करत असे. त्यामुळे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आलं. तो बराच काळ व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होता. सुमारे 6 महिन्यांपूर्वी त्याची पत्नी भरपो देवी त्याला घरी घेऊन आली. मात्र, भरपो आणि रामभगत वेगवेगळ्या घरात राहत होते. हा माणूस गावातच एका जुन्या घरात राहत होता.
advertisement
बोलावून घेतलं आणि मग...
एका तरुण रामभगतला दररोज जेवण देण्यासाठी यायचा. पण रविवारी भरपो देवी स्वतः जेवण घेऊन आली. जेवण दिल्यानंतर ती आपल्या घरी परतली. घरी पोहोचताच रामभगतने तिला फोन करून परत घरी येण्यास सांगितलं. भरपोला हे विचित्र वाटलं. तिने आपल्या सासूला सांगितलं. यावर सासू गीताही आपल्या सुनेसोबत मुलाला भेटायला गेली.
advertisement
दरवाजा बंद करून आग लावली
दरम्यान, माणसाच्या मनात वेगळाच डाव शिजत होता. दोघी घरात जाऊन खोलीत बसताच, आधीच तयारी करून ठेवलेल्या रामभगतने भरपो देवी आणि गीता यांच्यावर तेल शिंपडलं. नंतर त्यांना आग लावली. रामभगतने आधीच गेट बंद केलं होतं, जेणेकरून दोघी पळून जाऊ शकणार नाहीत. आग लागल्यावर दोघी ओरडल्या, पण रात्रीची वेळ असल्याने कोणालाही त्यांचा आवाज ऐकू आला नाही. गीताने कशीतरी खोलीचा दरवाजा उघडून जिन्याने बाहेर धाव घेतली. आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातील लोकं जागे होऊन बाहेर आले. पण तोपर्यंत गीता अर्ध्याहून अधिक जळाली होती.
advertisement
पण हत्या का केली?
गुन्हा केल्यानंतर रामभगतने गेट बंद करून घराबाहेर बसला. गावातील आणि कुटुंबीयांनी गीताला हिसारमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रामभगतने सुमारे तीन वर्षांपूर्वी भरपो देवीवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. भरपो त्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली होती. त्यानंतर वारंवार भांडणं होत होती. आरोपी रामभगतचे दोन भाऊ आणि इतर कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी दुसऱ्या गावात गेले होते. रामभगत, भरपो देवी आणि गीता यांच्याशिवाय घरात कोणीही नव्हतं. भरपो देवीला दोन मुली आहेत, असं कुटुंबीयांनी सांगितलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2025 3:47 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नीला फोन करून बोलावलं, तिच्यासोबत आई आली, दोघी खोलीत जाताच दरवाजा केला बंद आणि पुढे...







