हे बीडमध्येच घडू शकतं! शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात पिकवली 4 कोटींची अफू, पण...

Last Updated:

Opium Cultivation: बीडमधील एका शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात 4 कोटी 30 लाखांची अफू पिवकलीये. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई सुरू केलीये.

हे बीडमध्येच घडू शकतं! शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात पिकवली 4 कोटींची अफू, पण...
हे बीडमध्येच घडू शकतं! शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात पिकवली 4 कोटींची अफू, पण...
बीड: आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेती बेभरवशाची झाली असून शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. कमी काळात जास्त पैसे मिळवण्यासाठी काही शेतकरी गैरमार्गांना बळी पडत आहेत. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क अफूची शेती केलीये. धारुर तालुक्यातील पिंपरवाडाचे शेतकरी रामहरी कारभारी तिडके यांनी 4 कोटी रुपयांची अफूची शेती केल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याला अटक करण्यात आले असून 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथील शेत गट नं. 33 मध्ये रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने शेततळ्याच्या माध्यमातून पाणी संकलित करत तीन गुंठे क्षेत्रावर अफूची लागवड केली. यातून चार कोटी रुपयांची अफूची शेती पिकविल्याचे पोलिस कारवाईत उघड झालेय. शेतात अफू लागवडीबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक व धारूर पोलिसांनी ही कारवाई केली.
advertisement
तिडके यांनी शेतात अमली पदार्थांच्या झाडांची बेकायदेशीर आणि विनापरवाना लागवड केल्याचे दिसून आले. यावेळी अमली पदार्थ अफूची पांढरी शुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिवळसर पाने असलेली झाडे मुळासह काढण्यात आली. एकूण 45 गोण्या अफू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या वजनानुसार 540 किलो 759 ग्रॅम अफू जप्त केली. बाजारमूल्यानुसार 80 हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे जप्त अफूची किंमत 4 कोटी 32 लाख 60 हजार 720 रुपये आहे. रामहरी तिडके याच्याविरुद्ध धारूर ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (बी), 15, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करून करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
advertisement
दरम्यान, आरोपीला 2 मार्च रोजी धारूर न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उस्मान शेख, सपोनि विजयसिंग जोनवाल, उपनिरीक्षक महेश विघ्ने, ग्रेड उपनिरीक्षक हनुमान खेडकर, पोह. तुषार गायकवाड, महेश जोगदंड, भागवत शेलार, पो. अं. बप्पासाहेब घोडके, एएसआय संजय जायभाये तसेच धारूर ठाण्याचे सपोनि देविदास वाघमोडे, एएसआय भुसारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.
मराठी बातम्या/क्राइम/
हे बीडमध्येच घडू शकतं! शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात पिकवली 4 कोटींची अफू, पण...
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement