तो निवांत झोपला होता, 4 लोक घरात घुसले, चोरी सोडून कापलं त्याचं गुप्तांग, इतकंच नाही पुढे...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
गाझियाबादमध्ये क्रूर घटना समोर आली आहे. रात्री काही लोकांनी घरात घुसून एका व्यक्तीला बेशुद्ध केले व त्याचे गुप्तांग कापून फरार झाले. पीडिताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्ह्याचे सूत्रधार तृतीयपंथी...
Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वेव्ह सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे काही लोकांनी रात्री एका घरात घुसून एका पुरुषाचे गुप्तांग कापले. गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांनी गुप्तांग आणि वृषणही सोबत नेले. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पारो नावाच्या तृतीयपंथीयावर गुन्हा केल्याचा आरोप केला आहे.
घटनेमागे तृतीयपंथी गुरू असल्याचा आरोप
पीडित व्यक्ती सध्या मेरठच्या रुग्णालयात दाखल आहे. पीडित व्यक्तीच्या मुलाने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. मुलाने तक्रारीत म्हटलं आहे की, '28 फेब्रुवारीच्या रात्री 11-12 च्या सुमारास तीन-चार लोकं माझ्या वडिलांच्या खोलीत घुसले आणि त्यांना पकडून काहीतरी वास देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांचे गुप्तांग आणि वृषण हत्येच्या उद्देशाने कापले. त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांच्या अंगावर गरम पाणी टाकून त्यांना शुद्धीवर आणलं. यानंतर त्या गुन्हेगारांनी फोनवर बोलून पारो गुरु, काम झालं, असं म्हटलं. यानंतर ते गुन्हेगार गुप्तांग आणि वृषण घेऊन पळून गेले.'
advertisement
या घटनेमुळे परिसरात खळबळ
जेव्हा पीडित व्यक्ती वेदनेने विव्हळू लागला, तेव्हा शेजाऱ्यांनी किंकाळ्या ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर त्यांनी कुटुंबीय आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पीडित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पीडित व्यक्तीच्या मुलाने आरोप केला आहे की, तृतीयपंथी पारोने आपल्या साथीदारांकडून हे कृत्य घडवून आणलं आहे, ज्यामुळे त्याचे वडील कधीही सामान्य जीवन जगू शकणार नाहीत. पीडित व्यक्तीच्या मुलाने पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
हे ही वाचा : पत्नीला फोन करून बोलावलं, तिच्यासोबत आई आली, दोघी खोलीत जाताच दरवाजा केला बंद आणि पुढे...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 03, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तो निवांत झोपला होता, 4 लोक घरात घुसले, चोरी सोडून कापलं त्याचं गुप्तांग, इतकंच नाही पुढे...


