अचानक झुडपांमधून आली एक बकरी
पुस्तकानुसार, अँग्लो-अफगाण युद्धादरम्यान, गडवाल रायफल्सच्या सैनिकांना बराच काळ रणांगणावर थांबावं लागलं होतं. अन्न संपलं होतं. अनेक दिवसांपासून भुकेले सैनिक काहीच विचार करू शकत नव्हते. अचानक झुडपं हलू लागली. सैनिकांना वाटलं की, काही शत्रू दबा धरून बसले आहेत, म्हणून त्यांनी बंदुका रोखल्या. ते गोळीबार करण्यासाठी तयार होते, तेव्हा अचानक झुडपांमधून एक लठ्ठ आणि उंच बकरी बाहेर आली.
advertisement
बकरीने मिटवला सैनिकांच्या भूकेचा प्रश्न
अनेक दिवसांपासून भुकेल्या सैनिकांनी बकरीला मारून खाण्याचा विचार केला. जेव्हा ते तिला पकडायला गेले, तेव्हा ती बकरी पळून जाऊ लागली. सैनिक तिच्या जवळ आले, तेव्हा ती माती खोदायला लागली. सैनिकांनी पाहिलं की, जमिनीखाली बटाटे होते. यानंतर, सैनिकांनी एका बाजूने जमीन खोदण्यास सुरुवात केली. तिथून खूप बटाटे निघाले.
बकरी बनली 'जनरल बैजू'
सैनिकांसाठी अनेक दिवसांच्या जेवणाची सोय झाली. त्या बकरीने शेकडो सैनिकांना भुकेने मरण्यापासून वाचवलं. म्हणूनच, तिला लॅन्सडाउनला आणण्यात आलं आणि 'जनरल बैजू' चा दर्जा देण्यात आला. तिच्यासाठी तिथे एक खोली तयार करण्यात आली होती, ज्यात तिच्या खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त, ती लॅन्सडाउन मार्केटमधील कोणत्याही दुकानातून काहीही खाऊ शकत होती. ज्याचे पैसे तत्कालीन सरकार भरायचे.
हे ही वाचा : व्यक्ती नव्हे, 'हा' तर हैवान! 191 मृतदेहांसोबत केले घृणास्पद कृत्य, इतकंच नाही राखेऐवजी द्यायचा सिमेंट!
हे ही वाचा : तुमच्याकडे आहेत का हे खास 25 पैशांचे नाणे? मिळू शकतात 10 हजार रुपये! वाचा सविस्तर