एका मुलीचा साबन खाताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून कोणीही चकित होईल. कारण मुलगी म्हणजे मला साबन आवडतो आणि खायला लागते. हे प्रकरण थक्क करणारं आहे मात्र तुम्ही नीट पाहिलं तर ते साबन नसून भलतीच गोष्ट दिसते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी उभी आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर डेटॉल आणि साबन आहे. दोन्हीपैकी तिला साबण आवडतो म्हणत ती साबण खायला लागते. नंतर जेव्हा ती तो कट करते तेव्हा समजतं की हा साबण नसून कपकेक आहे जो साबणासारखा बनवला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोलकाताचा आहे.
advertisement
Suchi Dutta नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर लोक कमेंट करत आहेत. अनेकांनी कमेंट करत म्हटलं आम्हाला खरंच वाटलं साबण खातेय शेवटी पाहिल्यावर समजलं हा साबण नसून केक आहे. कोणी साबण खाण्याचा विचारही करु शकत नाही, असं काहींनी म्हटलं.
दरम्यान, सोशल मीडियावर असे विचित्र प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोण कधी काय करेल काही सांगू शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक असे व्हिडीओ टाकून प्रसिद्धी झोतात येतात.
