डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं, पण तिला अपेक्षा नव्हती की, लक्ष्मी तिच्यावर इतकी कृपा करेल. मात्र, त्यानंतर महिलेने जे काही केलं, त्यामुळे तिचा माजी प्रियकर हादरला आहे. ही संपूर्ण कहाणी ऐकून, तुम्हालाही प्रश्न पडेल की, महिलेने तिच्या प्रियकराच्या कोणत्या विश्वासघाताचा बदला घेतला?
लॉटरी जिंकताच गर्लफ्रेंड 'बेईमान' झाली!
advertisement
शार्लोट कॉक्स नावाच्या महिलेने एक स्क्रॅच कार्ड खरेदी केलं होतं, ज्यावर तिला 10 लाख पौंड म्हणजेच 11 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. यानंतर महिलेने पहिली गोष्ट केली ती म्हणजे तिचा प्रियकर मायकलसोबत ब्रेकअप आणि सोशल मीडियावर तिच्या संपत्तीचं प्रदर्शन सुरू केलं. इतकंच नाही, तर तिला कायली ईस्ट नावाचा नवीन प्रियकर मिळाला आणि ती त्याच्यासोबत हनिमून करण्यासाठी निघून गेली. तिने ईस्टसाठी 55 लाख 45 हजार रुपयांची BMW कार खरेदी केली आणि दोघांनी मिळून केटरिंगचा व्यवसायही सुरू केला.
लाॅटरीचं तिकीट जुन्या बाॅयफ्रेंडच्या पैशांतूनच केलं होतं खरेदी
इतकंच नाही, तर शार्लोटने तिच्या जुन्या प्रियकराला जळवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक कमेंट्सही केल्या, ज्याची लोकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. दरम्यान, शार्लोटने ज्या पैशातून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं, ते पैसे त्याने ट्रान्सफर केले होते, यावरून मायकलने कायदेशीर कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत, तिने लॉटरीत जिंकलेले पैसे त्याच्यासोबत वाटून घ्यावेत. मात्र, शार्लोट हे पैसे मायकलने ट्रान्सफर केल्याचं पूर्णपणे नाकारत आहे.
