TRENDING:

कष्टाचे पैसे नको! फक्त 1 रुपयात वाजगाजत नवरीला घरी घेऊन गेला नवरदेव, हुंड्याचे 31 लाख रुपये नाकारले

Last Updated:

Groom Rejected Dowry : ताटात सजवलेले 31 लाख हुंड्याचे पैसे पाहून नवरदेव वधूपक्षासमोर हात जोडून नतमस्तक झाला आणि म्हणाला, "मी हे स्वीकारू शकत नाही"

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजवर तुम्ही बरीच लग्न पाहिली असतील. लग्न म्हटलं की लाखोंचा खर्च होतो. विशेषत: वधूकडे... भारतात हुंड्याला कायद्याने बंदी असली तरी हुंडा घेणाऱ्यांची कमी नाही. काही वेळा तर वधूचं कुटुंबच स्वतःहून हुंडा देतात. असंच एक लग्न ज्यात वधूच्या कुटुंबाने नवरदेवासमोर तब्बल 31 लाख रुपये ठेवले पण त्याने त्यातील फक्त एक रुपया घेतला आणि एका रुपयात लग्न केलं आहे.
News18
News18
advertisement

उत्तर प्रदेशमधील या लग्नाची चर्चा होते आहे. मुझफ्फरनगरच्या नागवा गावातील अवधेश राणा एक कॉस्मेटिक व्यावसायिक. त्याचं लग्न सहारनपूर जिल्ह्याच्या रंखंडी गावातील अदितीशी सिंगशी ठरलं. अदितीचे वडील सुनील सिंग यांचा कोरोना महासाथीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अदिती तिचा भाऊ आणि आई सीमा देवी त्यांचा मामा सुखपाल सिंगच्या घरी शहाबादिपुरात राहत होते. अदितीने MSc पूर्ण केलं त्यानंतर तिच्या आजोबांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी तिच्या लग्नाची संपूर्ण व्यवस्था केली. अगदी त्यांनी हुंडा द्यायचीही तयारी दर्शवली. थोडाथोडका नव्हे तर तब्बल 31 लाख रुपयांचा हुंडा.

advertisement

बाजूला बसलेली नवरी, मोबाईलवर दिसला तिचा फोटो, नवरेदवाने लग्नच मोडलं; प्रकरण काय?

22 नोव्हेंबर... लग्नाचा दिवस. नवरदेव अवधेश नवरी अदितीला घ्यायला वाजतगाजत आला. त्यांचं स्वागनत करण्यात आलं. त्यानंतर अदितीच्या कुटुंबाने अवधेशसमोर पैशांच्या नोटांनी सजवलेलं ताट ठेवलं. त्यात 31 लाख रुपयांच्या नोटा होत्या. ज्या हुंडा म्हणून दिल्या जात होत्या. पण अवधेशन या 31 लाखांतील फक्त एक रुपया घेतला. 31 लाखांचा हुंडा त्याने वधूच्या कुटुंबाला परत केला.

advertisement

हुंड्याचे पैसे वधूपक्षाला परत करताना वर त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक झाला आणि म्हणाला, "हे वधूच्या वडिलांचे कष्टाने मिळवलेले पैसे आहेत. मी हे स्वीकारू शकत नाही. मला हे घेण्याचा कोणताही अधिकार नाही." अवधेशच्या आईवडिलांनीही त्याला त्याच्या या निर्णयात साथ दिली, ते त्याच्या निर्णयाच्या बाजूने होते.  तर वधूपक्षानेही याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

advertisement

ऐन लग्नात नवरदेवाला झाली टॉयलेटला, बाथरूममध्ये पळताच नवरीजवळ झाली पुरुषांची गर्दी, एकएक करत केलं असं कृत्य की VIDEO VIRAL

यानंतर वरमाला, कन्यादान अशा विधींसह अगदी थाटात उत्साह विवाह पार पडला. वधू हसतमुखाने आणि सन्मानाने तिच्या नव्या घरी गेली. गावकऱ्यांनी वराच्या या भूमिकेचं कौतुक करत हे हुंड्याविरोधातील एक मजबूत संदेश आणि विवाहातील समतेकडे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

गावकऱ्यांनी सांगितलं की अवधेश राणाने सर्वांसमोर हात जोडून पैसे परत केल्याची घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. हुंडा मागणाऱ्यांना दिलेला प्रतीकात्मक कठोर संदेश. हे लग्न आता हानिकारक सामाजिक प्रथांना नाकारण्याचं आदर्श उदाहरण ठरत आहे, असं एका गावकऱ्याने सांगितलं.

मराठी बातम्या/Viral/
कष्टाचे पैसे नको! फक्त 1 रुपयात वाजगाजत नवरीला घरी घेऊन गेला नवरदेव, हुंड्याचे 31 लाख रुपये नाकारले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल