ही घटना इजिप्तमधील आहे. 34 वर्षांचा पुरुष आणि 28 वर्षांची महिला. कपलची ओळख फेसबुकवर झाली होती. महिला सतत आपले फोटो इथं पोस्ट करायची. तिला पाहताच तो घायाळ झाला. त्याने तिला डेट केलं. काही डेट्सनंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला तिचे लूक आवडले.
3 वर्षांचं रिलेशन, पण एकदाही KISS नाही; गर्लफ्रेंडचं सत्य समजताच बॉयफ्रेंड पुरता हादरला
advertisement
लग्न झालं, सुहागरात झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पत्नी उठली. तेव्हा पतीला धक्का बसला. पत्नीचा खरा चेहरा समोर आला. पत्नी मेकअपशिवाय होती आणि तिला पाहताच तो ओरडू लागला. त्याने पत्नीला ओळखण्यासच नकार दिला. इतकंच नव्हे तर त्याने थेट मेकअपच मागिताल. पत्नीने मेकअपने तिचे लूक लपवले, आपली फसवणूक केली असा आरोप त्याने केले. मेकअपशिवाय पाहून पतीने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली त्यामुळे महिलेला खूप वाईट वाटलं.
एका मुलीची आई, एकाच वेळी 2-2 मुलांसोबत ठेवले संबंध, भयानक शेवट
शेवटी हे प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं. पतीने दावा केला की फेसबुकवरील फोटोशॉप केलेल्या प्रतिमांमुळे त्याची दिशाभूल झाली आहे. 2021 मध्ये गल्फ न्यूजने हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं, तेव्हा चांगलंच चर्चेत आलं. आता 2025 मध्ये करवा चौथच्या दिवशी, जेव्हा महिला मेकअप करतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, तेव्हा हे प्रकरण पुन्हा व्हायरल झालं.
नवरीकडे गेली नजर, नवरदेवाने मंडपातच मोडलं लग्न
हे प्रकरण भारतातलं. हरियाणातील एका कुटुंबाने त्यांच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी यूपीतल्या चौरीचौरा येथील एका महिलेशी संपर्क साधला होता. महिलेने तरुणाच्या कुटुंबीयांना गोरखपूरच्या एका कुटुंबातील मुलीबद्दल सांगितलं. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आनंदाने लग्नाला होकार दिला. लग्नासाठी तरुणाने मुलीच्या कुटुंबीयांना पैसे पाठवले. शनिवारी मंदिरात लग्न करण्याचे ठरले. मात्र सात फेरे घेण्यापूर्वीच वराने लग्नास नकार दिला.
आपल्याला दुसऱ्या मुलीचा फोटो पाठवला गेला होता आणि नवरी सावळी आहे त्यामुळे त्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप मुलाने केला आहे. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मंदिरातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मंदिर परिसरात गोंधळाची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले.