TRENDING:

नको मला बंगला, गाडी, उंट पाहिजे! नवरदेवाचा हट्ट; पण सासरच्यांनी म्हैस दिली आणि पुढे भयंकर घडलं

Last Updated:

Dowry News : लग्नात हुंड्यात उंट दिला नाही, उंटाऐवजी म्हैस दिली म्हणून तो नाराज होता. तिला तिच्या रंगावरूनही टोमणे मारायचा, तिला मारहाण करायचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजमेर : भारतात हुंडा कायद्याने गुन्हा आहे. तरी हुंड्याची प्रथा काही थांबलेली नाही. आजही काही लोक आहेत जे हुंडा मागतात. कुणी दागिने, कुणी घर, कुणी गाडी मागतं. पण एक असा नवरदेव ज्याने हुंड्यात उंट मागितला. पण सासरच्यांनी उंटाऐवजी म्हैस दिली. त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
advertisement

राजस्थानमधील हे धक्कादायक प्रकरण. कलावती आणि काशीराम हे कपल. त्यांचं लग्न 1991 साली झालं होतं. लग्नानंतर 6 महिन्यांनी कलावती माहेरी गेली. तेव्हा तिने आपल्या आईवडिलांना काशीराम तिचा छळ करत असल्याचं सांगितलं. लग्नात हुंड्यात उंट दिला नाही, उंटाऐवजी म्हैस दिली म्हणून तो नाराज होता. तिला तिच्या रंगावरूनही टोमणे मारायचा, तिला मारहाण करायचा.

advertisement

काशीरामचे वडील हरचंद यांच्याकडे पंचायत बोलावण्यात आली. हरचंद यांनी आपला मुलगा आपल्या नियंत्रणात नसल्याचं सांगितलं. तेव्हा पंचायतीच्या विनंतीवरून कलावतीला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवण्यात आलं. दोन वर्षांनी हरचंद कलावतीच्या माहेरी गेला आणि त्याने काशीराम बदलला असल्याचं सांगितलं, आता तो असं वागणार नसल्याचं आश्वासन दिलं आणि तो कलावतीला पुन्हा सासरी घेऊन गेला. 

advertisement

4 वर्षांनी संपूर्ण कुटुंब गायब

कलावती पुन्हा सासरच्या घरी राहू लागली, याला 4 वर्षे उलटली. काशीरामने वडिलांचं घर सोडलं होतं आणि पत्नी मुलांसह श्रीगंगानगरच्या प्रेमनगर इथं भाड्याच्या घरात राहत होता.  कलावतीचा भाऊ दूध देण्यासाठी तिथं जात असेल, ज्यामुळे त्याला त्यांची खबरही मिळत असे. 3 फेब्रुवारी 1998 ला कलावतीने भावाला दूध आणू नको सांगितलं. दुसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी 1998 रोजी कलावतीची आई जयकौरी कलावतीच्या घरी गेली. पण घराला कुलूप होतं. ती सलग दोन दिवस तिथं आली. संपूर्ण कुटुंब अचानक गायब झालं होतं. त्यांचा शोध घेतला तर काहीच पत्ता नाही. शेवटी घराचं टाळं तोडलं. तर दृश्य पाहून सगळे हादरले.

advertisement

तिला पाहताच लट्टू झाला, लगेच लग्नाच्या बोहल्यावर चढला; सुहागरातनंतर पस्तावतोय नवरा

बेडवर कलावती, तिची अडीच वर्षांची मुलगी सुमन आणि अडीच महिन्यांची मुलगी गुड्डी यांचे मृतदेह होते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये कलावती आणि तिच्या दोन्ही मुलांचा मृत्यू गुदमरून झाल्याचं समजलं. कलावतीच्या शरीरावर जखमाही आढळल्या. घटनेला 10 दिवस उलटूनही काशीराम घरी परतला नाही. पत्नी आणि मुलांच्या अंत्यसंस्कारालाही नव्हता.  त्यामुळे कलावतीचे काका इंद्रभान यांनी पोलिसात तक्रार केली. काशीरामने पत्नी आणि 2 मुलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. पोलिस चौकशीदरम्यान कलावतीचा भाऊ आणि इतर नातेवाईकांनी काशीराम आणि कलावती यांच्यातील मतभेदाबद्दलही सांगितलं. गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी काशीरामचा शोध सुरू केला.

advertisement

प्रकरण कोर्टात

17 फेब्रुवारी 1998 रोजी पोलिसांनी सुरतगडमध्ये काशीरामला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. त्याने सांगितलं की त्याचं कलावतीशी भांडण झालं होतं. 3 फेब्रुवारीच्या रात्री त्याने तिचा आणि त्यांच्या दोन मुलांचा दोरीने गळा दाबून खून केला, घराला कुलूप लावलं आणि सुरतगडला पळून गेला. 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्याच्या ठिकाणावरून दोरी आणि घराच्या चाव्या जप्त केल्या.

मुलाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, सासरा सुनेसोबत; खुलेआम दिली अशी ऑफर, सगळीकडे चर्चा

श्री गंगानगर येथील ट्रायल कोर्टात हे प्रकरण गेलं. सर्व साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे 21 डिसेंबर 1999 रोजी काशीरामला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. काशीरामने त्याच्या शिक्षेला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्याला जामिनावर सोडलं. 3 फेब्रुवारी रोजी काशीराम कलावती आणि मुलांसोबत दिसला यावरून हे सिद्ध होत नाही की काशीरामने खून केला, असं कोर्टानं म्हटलं. पुराव्यांअभावी सत्र न्यायालयाने दिलेली मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली आणि काशीरामला 1 नोव्हेंबर 2000 रोजी जामिनावर सोडण्याचा आदेश देण्यात आला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत लक्ष्मीपूजनला या चुका टाळा! अन्यथा आयुष्यभर पस्तवाल, गुरुजींनी सांगितलं
सर्व पहा

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार या प्रकरणात राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत आरोपी काशीरामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच त्याचे जामीनपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी काशीराम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

मराठी बातम्या/Viral/
नको मला बंगला, गाडी, उंट पाहिजे! नवरदेवाचा हट्ट; पण सासरच्यांनी म्हैस दिली आणि पुढे भयंकर घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल