TRENDING:

Hanging Pillar Temple: भारतातील असं मंदिर जिथे खांब हवेत लटकतो, शास्त्रज्ञांनाही उलगडलं नाही गूढ!

Last Updated:

जगभरात अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी एक वेगळी मान्यता आहेत. अनेक रहस्यमयी गोष्टी असलेले मंदिरेही असून त्यांच्याविषयी शास्त्रज्ञानाही अजून काही मिळालं नाही. या रहस्यमयी गोष्टी लोकांसोबत शास्त्रज्ञांनाही चकित करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 डिसेंबर : जगभरात अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराची आपली अशी एक वेगळी मान्यता आहेत. अनेक रहस्यमयी गोष्टी असलेले मंदिरेही असून त्यांच्याविषयी शास्त्रज्ञानाही अजून काही मिळालं नाही. या रहस्यमयी गोष्टी लोकांसोबत शास्त्रज्ञांनाही चकित करतात. असंच एक मंदिर आहे जिथे खांब हवेत डोलतो. आजतागायत शास्त्रज्ञही यामागचं गूढ शोधून शकले नाही. या रहस्यमयी मंदिराविषयी जाणून घेऊया.
 भारतातील असं मंदिर जिथे खांब हवेत लटकतो
भारतातील असं मंदिर जिथे खांब हवेत लटकतो
advertisement

खांब हवेत लटकणारे हे रहस्यमयी मंदिर आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात आहे. या मंदिराचे नाव लेपाक्षी मंदिर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. प्राचीन मान्यतेनुसार लेपाक्षी मंदिराचा उल्लेख रामायणात आढळतो. असं मानलं जातं की ही ती जागा आहे जिथे जटायू जखमी झाल्यानंतर पडला होता. माता सीतेचे रावणानं अपहरण केलं तेव्हा तिला वाचवण्यासाठी जटायू तिच्या मागे गेला. यादरम्यान रावणानं जटायूचा पंख कापून जखमी केलं होतं.

advertisement

लेपाक्षी मंदिराला हँगिंग पिलर टेंपल असंही म्हणतात. या मंदिरात 70 खांब आहेत. यापैकी एक असा खांब आहे जो जमिनीला टेकलेला नाही. हा खांब हवेत लटकलेला आहे. येथील प्रत्येक येणारा व्यक्ती खांबाखाली कापड टाकून पाहतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा खांब जमिनीपासून अर्धा इंच वर उभा आहे.

advertisement

लेपाक्षी मंदिरात तुम्हाला एक अनोखं शिवलिंगही पाहायला मिळेल. या शिवलिंगाची स्थापना मुख्य मंदिराच्या मागील भागात करण्यात आली आहे. या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे हे महाकाय नागाच्या खाली बांधलेलं आहे. लेपाक्षी मंदिरात जाणार असाल तर बंगळुरू विमानतळ सर्वात जवळ आहे. लेपाक्षी मंदिर येथून 120 किलोमीटर अंतरावर आहे. पक्षी मंदिरासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन हिंदूपूर आहे, जे मंदिरापासून सुमारे 14 किमी अंतरावर आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, जगभरात अशी अनेक मंदिरे आहेत ज्याची रहस्य, गूढ, शास्त्रज्ञही सोडवू शकले नाही. अनेक आश्चर्यकारक गोष्ट असतात ज्याची विशेष मान्यता असते जी वर्षानुवर्षे चालत आली आहे.

मराठी बातम्या/Viral/
Hanging Pillar Temple: भारतातील असं मंदिर जिथे खांब हवेत लटकतो, शास्त्रज्ञांनाही उलगडलं नाही गूढ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल