TRENDING:

एकीकडे शिवभक्ती दुसरीकडे आई-वडिलांवर उगरला हात, फेमस यूट्यूबरचा धक्कादायक Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप

Last Updated:

तिच्याच आईवडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदललं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात सोशल मीडियामुळे अनेक तरुण चेहरे प्रसिद्ध होत आहेत. काहींचं टॅलेंट त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवतं, तर काहीजण वादांमुळे चर्चेत येतात. उत्तर प्रदेशातील हापुड़ येथील लोकप्रिय यूट्यूबर वंशिका सध्या अशाच एका वादामुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण तिचं गाणं किंवा डान्स व्हिडिओ नसून स्वतःच्या आईवडिलांशी केलेलं वाईट वर्तन आहे. ही वंशिका तिच आहे, जी हरहर शंभो गाण्यामुळे प्रसिद्ध झाली आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

वंशिकेवर तिच्याच आईवडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की प्रसिद्धी मिळाल्यानंतर वंशिकाचं वागणं पूर्णपणे बदललं आहे. ती आता घरच्यांशी उद्धटपणे बोलते, हातउचलते आणि अगदी घराबाहेर काढण्याची धमकीही देते. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून लोकांमध्ये संताप पसरला आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसलं काय?

advertisement

हा प्रकार हापुड़च्या आदर्श नगर परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये वंशिका आपल्या आईशी भांडताना आणि हात उचलताना दिसते. “हे घर माझा आहे, प्लॉट माझा आहे.” असं बोलताना तु्म्ही त्या व्हिडीओमध्ये तिला ऐकू शकता. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद होतो आणि परिस्थिती हातघाईपर्यंत पोहोचते. आजूबाजूला रहाणाऱ्यांचं म्हणणं आहे की, गेल्या काही महिन्यांपासून या घरातून सतत भांडणांचे आवाज येत असतात.

advertisement

वंशिका आणि तिच्या कुटुंबातला वाद एका प्लॉटच्या मालकी हक्कावरून सुरु झाला असल्याचं समजतं. घरच्यांचं म्हणणं आहे की, वंशिकेने सोशल मीडियावरून मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आणि कमाईनंतर त्या प्लॉटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आईवडिलांनी याला विरोध केला, तेव्हा वंशिकेने त्यांच्या सोबत गैरवर्तन करून घराबाहेर काढण्याची धमकी दिली.

वंशिकेसोबत काम करणारा तिचा मॅनेजर हिमांशू याच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. कुटुंबियांचं म्हणणं आहे की हिमांशूने वंशिकाची दिशाभूल केली आणि घरच्यांपासून दूर केलं. एवढंच नव्हे, तर तो वंशिकेच्या सोशल मीडियावरील कमाईवर नियंत्रण ठेवत असल्याचंही सांगितलं जातं. वंशिकेच्या आईनं सांगितलं की, “पूर्वी मुलगी खूप साधी आणि नम्र होती, पण हिमांशू आल्यापासून तिचं वागणं पूर्णपणे बदललं.”

advertisement

advertisement

कोण आहे वंशिका?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 ते 4 लाख उत्पन्न देणारा बिजल्या, शेतकऱ्याने 11 लाखांना का विकला?
सर्व पहा

वंशिका आपल्या Instagram आणि YouTube चॅनेलवर डान्सिंग व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे Vanshika Hapur Official Vk. हापुड़ (उत्तर प्रदेश) येथे राहणारी वंशिका, एका गरीब कुटुंबातून आली आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये तिनं सांगितलं होतं की, “मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझ्या आईवडिलांसाठी जायचं आहे.” काही काळानंतर ती ‘हर हर शंभू’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या फरमानी नाज यांच्या एका गाण्यातही झळकली होती.

मराठी बातम्या/Viral/
एकीकडे शिवभक्ती दुसरीकडे आई-वडिलांवर उगरला हात, फेमस यूट्यूबरचा धक्कादायक Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल