स्टंट करताना मोठी चूक, चेहऱ्यावर पेटली आग
पण एका तरुणाने कॅमेऱ्यासमोर स्टंट करताना मोठी चूक केली आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या तरुणाने तोंडात लायटर धरून एक असा स्टंट केला की, त्याचा संपूर्ण चेहरा आगीने झाकला गेला. काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावर जणू आगीचा गोळा तयार झाला आणि हा धक्कादायक प्रकार पाहून कुणालाही भीती वाटेल.
advertisement
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, हा तरुण आपल्या तोंडात लायटर धरतो आणि दुसऱ्या हातातही एक पेटलेला लायटर असतो. जसा तो तोंडात असलेला लायटर तोडतो, तसा आगीचा भडका उडतो. काही सेकंदांत त्याचा चेहरा आगीने झाकला जातो. मात्र, प्रसंगावधान राखून तो झटकन हातांनी आग विझवतो.
व्हिडिओ व्हायरल, 'Ghost Rider' ची आठवण
हा धक्कादायक व्हिडिओ Instagram वर dirwannnnnnnnn या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या क्लिपला 18 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
- एका युजरने लिहिलं - "हेच म्हणतात मृत्यूच्या जबड्यातून सुटणं!"
- दुसऱ्याने कमेंट केली - "जेव्हा मुलांना काही करायला मिळत नाही, तेव्हा ते असं करतात."
- तिसरा म्हणतो - "म्हणूनच मुलांची सरासरी आयुष्य कमी असते!"
- एकाने लिहिलं - "देवाने त्याला दुसरं जीवन दिलं आहे."
बर्याच युजर्सनी हा व्हिडिओ पाहून 'Ghost Rider' या प्रसिद्ध चित्रपटाची आठवण झाल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून, स्टंट करताना काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.
हे ही वाचा : कुणी पादलं तर नाक दाबू नका, बिनधास्त घ्या फार्टच्या गॅसचा वास, संशोधकांनी सांगितला फायदा
हे ही वाचा : शाब्बास! या शाळेत विद्यार्थ्यांनी सुरु केलाय स्वतःचा व्यवसाय, 6 महिन्यांत घेतलं 8 लाखांचं उत्पन्न!