तुम्ही रिंगणात दोन व्यक्तींना एकमेकांशी दोन हात करताना पाहिलं असेल. मात्र कधी एखाद्या सिंहाला व्यक्तीशी रिंगणात भिडताना पाहिलंय का? सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिंह अगदी माणसासारखाच व्यक्तीशी फाईट करत आहे. रिंगणात कोण कोणावर बाजी मारतं हे व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यावर समजतं.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिंगणामध्ये एक सिंह आणि व्यक्ती एकमेकांशी फाईट करत आहेत. सिंह माणसाप्रमाणेच त्या व्यक्तीशी दोन हात करतोय. कधी सिंह त्याला मागे टाकतो तर कधी व्यक्ती सिंहापेक्षा जास्त सरस ठरताना दिसतो. एक वेळ अशी येते की तो सिंहाला उचलून खाली फेकतो, पण सिंह सुद्धा हार मानत नाही आणि लगेच उभा राहून पुन्हा व्यक्तीला खाली पाडतो.
advertisement
हा व्हिडिओ 1930 च्या दशकातील असल्याचं सांगण्यात येत आहे. @historyinmemes नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 9 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ माजवत आहे. काही वेळातच व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किती सत्यता आहे हे सांगू शकत नाही मात्र हा व्हिडीओ सध्या सर्वांना थक्क करत आहे.
