TRENDING:

Shillong Couple Missing : हनिमुनला जाताना राजा-सोनमसारखी चुक करु नका; 'या' गोष्टी कपलनं नेहमी ठेवा लक्षात

Last Updated:

सोनम अद्याप बेपत्ता आहे आणि कुटुंबीय तिचं अपहरण झाल्याचा दावा करत आहेत; एनडीआरएफ-एसडीआरएफच्या पथकांकडून शोधकार्य सुरू आहे, ते सोनमचा शोध घेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बहुतेक जोडप्यांना वाटतं की हनिमूनला म्हणजे फक्त निसर्गाचा आस्वाद आणि परस्परांची सोबत पाहिजे बस. ना गर्दी ना दोघात कोणी तिसरा. हनिमुनला गेलेल्या प्रत्येक कपलला असं वाटत असतं, पण कधीकधी हे स्वप्नसुंदर स्थळं अनोळखी जोखमींचं रूपही धारण करतात. त्याचंच ताजं उदाहरण म्हणजे अलीकडच्या काळात चर्चेत आलेलं मध्य प्रदेशातील इंदोरमधील नवदांपत्याचं प्रकरण.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

मे 22, 2025 रोजी एका हॉटेलमधून चेक-आऊट करून इंदोरचं कपल राजा आणि सोनम रघुवंशी हे दोघं सोहरा (चेरापूंजी)च्या दिशेने निघाले. काही दिवसांनी राजाचा मृतदेह वेइसॉडोंग धबधब्याखाली आढळला; त्याच्या डोक्यावर आरीनं वार केल्याचं तपासात निष्पन्न झालं

पण सोनम अद्याप बेपत्ता आहे आणि कुटुंबीय तिचं अपहरण झाल्याचा दावा करत आहेत; एनडीआरएफ-एसडीआरएफच्या पथकांकडून शोधकार्य सुरू आहे, ते सोनमचा शोध घेत आहेत.

advertisement

ही घटना दाखवून देते की हनिमून ट्रिपवर रोमँसइतकंच ‘सेन्सिबल सेफ्टी’ही महत्त्वाची आहे. शिवाय कपलनं प्रेम आणि एकांतात हरवून न जातं थोडी हुशारी दाखवणं आणि सेफ्टी प्रिकॉशन घेणं देखील महत्वाचं आहे.

अशावेळी कपलनं हनिमुनला फिरायला गेल्यावर सेफ्टिसाठी काय टिप्स घ्याल? चला जाणून घेऊ.

-ट्रेक रूट, हवामान, स्थानिक प्रथा-कायदे आणि मोबाइल नेटवर्कची उपलब्धता सर्वात आधी तपासा.

advertisement

-विश्वसनीय प्रवास विमा काढा, सोबत मेडिकल आणि ॲडव्हेंचर-स्पोर्ट्स कव्हर असलेला पॉलिसी प्लॅन निवडा.

-स्थानिक गाइड बुक करताना त्यांचा परवाना आणि रेकॉर्ड तपासा; कमी पैशात गाईड मिळतोय म्हणून अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.

-पासपोर्ट, आयडी, तिकीटं, ट्रॅव्हल इन्सुरन्स इ. क्लाउडवर/ई-मेलमध्ये सुरक्षित ठेवा.

-दोन्ही घरच्यांना तुम्ही नेमकं कुठे आहात, पुढचा दिनक्रम काय आहे, हे अपडेट देत राहा.

advertisement

-ओटीए रेटिंग, सीसीटीव्ही, २४x७ रिसेप्शन आणि स्थानिक पोलिस किती जवळ आहेत हे पाहूनच हॉटेल निवडा.

-रहदारी आणि रस्ते यांची स्थिती समजून घ्या. टेकड्या-घळ्यांतील अरुंद रस्ते, निसरडे ट्रेल्स आणि धुकं यामुळे प्रवास कधीही लांबू शकतो.

-ट्रेक, रिव्हर-क्रॉसिंग, पॅराग्लायडिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीज पूर्वतयारी हे प्रशिक्षित लोक असतील तरच करा.

-रात्री अनोळखी ठीकाणी फिरु नका. पहाटे-रात्रीच्या वेळेस निर्जन पॉइंट्स किंवा व्ह्यू-पॉइंट्सना जाणं टाळा.

advertisement

-पोलीस, रुग्णवाहिका, हॉटेल रिसेप्शन आणि स्थानिक मित्र यांचे नंबर ऑफलाइन सेव्ह ठेवा.

-रोमँटिक पोस्ट्स थोडं ‘लेट पोस्ट’ करा, लाईव्ह लोकेशन शेअरिंग सोशल मिडियावर लोकेशन; हे सगळं प्रवासानंतर करा. म्हणजे कोणी अनोळखी लोकांना तुम्ही तिथे असल्याची माहिती मिळणार नाही.

-सगळी रोख रक्कम किंवा कार्ड एकाच पर्स/बॅगमध्ये ठेवू नका. स्नॅक्स, पाण्याची बाटली, प्राथमिक औषधं, पॉवरबँक बरोबर ठेवा. संशयास्पद हालचाली दिसल्या तर तत्काळ पोलिसांना कळवा

-‘प्राइवसी’पेक्षाही व्यक्तीगत सुरक्षितता प्राधान्य द्या; स्थानिक नंबरवर लगेच कॉल करा.

प्रेमाच्या आठवणी साठवण्यासाठी कोणतं राज्या सुंदर असतो, इंदोरमधील कपलच्या या प्रसंगाने शिकवलंय की डेस्टिनेशनमध्ये ‘लाईन ऑफ ब्यूटी’ सोबतच ‘लाईन ऑफ सेफ्टी’ आखणे अत्यावश्यक आहे. काळजीपूर्वक नियोजन, सतर्क राहणं आणि एकमेकांना सांभाळणं हे गरडेचं आहे.

मराठी बातम्या/Viral/
Shillong Couple Missing : हनिमुनला जाताना राजा-सोनमसारखी चुक करु नका; 'या' गोष्टी कपलनं नेहमी ठेवा लक्षात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल