खरं तर, घड्याळासारखी मूलभूत वस्तू हॉटेलच्या खोलीत नसणं ही अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. पण यामागे एक व्यवसायिक कारण आहे आणि ते अगदी कल्पनाही न करता येईल असं आहे.
हॉटेलमध्ये घड्याळ का नसतं?
अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हॉटेल साख्यांनी जाणूनबुजून त्यांच्या रूम्समध्ये घड्याळ ठेवणं टाळलेलं असतं. यामागची प्रमुख कल्पना म्हणजे ग्राहकांना 'वेळेचा विसर' पडावा.
advertisement
हॉटेल व्यवस्थापन असं मानतं की जर खोलीमध्ये वेळ दाखवणारं साधन नसेल, तर तिथं राहणारा ग्राहक कोणत्याही घाईत नसेल, तो जास्त वेळ आरामात राहील, सणसणीत वेळेचा विचार न करता सेवांचा उपभोग घेईल. यामुळे ग्राहकाचा राहण्याचा कालावधी वाढतो आणि अर्थातच हॉटेलचा महसूल देखील.
ग्राहक जेव्हा वेळेच्या तणावापासून दूर राहतो, तेव्हा त्याला हॉटेलचा अनुभव अधिक सुखद वाटतो. त्याला 'चेकआउट' किंवा 'ऑफिस मीटिंग' याचा विसर पडतो आणि तो हॉटेलमध्ये जास्त वेळ घालवतो.
यामुळे हॉटेलमधील रेस्टॉरंट, स्पा, मिनीबार यांसारख्या अतिरिक्त सेवांचा उपयोग होतो. जे हॉटेलसाठी फायदेशीर ठरतं.
आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलच्या खोलीत घड्याळ शोधाल आणि ते तिथं नसेल, तेव्हा समजून घ्या ही केवळ चूक नाही, तर एक रणनीती आहे.