TRENDING:

कोंबडीला अंड द्यायला कोंबड्याची गरज असते का? 99 टक्के लोकांना माहित नसेल

Last Updated:

शरीरात अंड तयार होण्यासाठी कोंबडीला जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. आवश्यक तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास कोंबडी स्वतः अंड तयार करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुष्ण कुमार, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

नागौर : आधी कोंबडी की अंड? या विचित्र प्रश्नाने आपल्याला लहानपणापासून सतावलंय. परंतु तुम्हाला माहितीये का, कोंबडी ही आपल्या शरिरात स्वतः अंड तयार करू शकते. म्हणजेच इतर प्राणी ज्याप्रकारे प्रजननानंतर बाळाला जन्म देतात. तशी कोंबडीही प्रजननाच्या क्रियेनंतर अंडी देते. मात्र तिच्याबाबत ही क्रिया व्हायलाच हवी असं काही नाहीये, तर कोंबडी या क्रियेशिवाय म्हणजेच कोंबड्याशिवायही अंडी देऊ शकते. कसं? जाणून घेऊया…

advertisement

शरीरात अंड तयार होण्यासाठी कोंबडीला जास्तीत जास्त कॅल्शियमची गरज असते. आवश्यक ते पोषक तत्त्व योग्य प्रमाणात मिळाल्यास कोंबडी स्वतः अंड तयार करू शकते. पशू रोग तज्ज्ञ नरेंद्र चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोंबडीचं अंड तयार होण्यासाठी त्यांनी चूनखडक म्हणजेच लाइमस्टोन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं.

आता कडकनाथ विसरा 'या' कोंबड्या पाळा, चौथ्या महिन्यात व्हाल मालामाल!

advertisement

भूगर्भात आढळणाऱ्या अतिशय महागड्या चूनखडकात जवळपास 97% कॅल्शियम असतं. त्यामुळे याच खडकाचा वापर कोंबडीची अंडी बनवण्यासाठी केला जातो, मात्र ही अंडी कोंबडीच्या पोटातच तयार होतात. नरेंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चूनखडकाला मशीनमध्ये अगदी बाजरीच्या दाण्यांप्रमाणे बारीक करून ते दाणे कोंबडीला खायला दिले जातात. दररोज साधारण 7 ते 8 ग्रॅम चूनखडक खाल्ल्यास प्रजननेच्या क्रियेशिवाय कोंबडीच्या शरीरात अंडी तयार होतात. विशेष म्हणजे चूनखडकामुळे कोंबडीच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. शिवाय अंडी तयार होण्यापासून ते अंडी देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आणि त्यानंतरही कोंबडीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होत नाही.

advertisement

मटणापेक्षा चवदार, चिकनही पडतंय फिकं! आता 'या' मांसाला सर्वाधिक मागणी

दरम्यान, राजस्थानच्या खींवसर भागात असलेल्या बालाजी इंडस्ट्रियलचे मालक नरेश यांनी सांगितलं की, चूनखडक हे प्रत्येक ठिकाणी आढळत नाहीत, त्यामुळे आम्ही भारतातील विविध ठिकाणी खास कोंबडीच्या अंड्यांसाठी चूनखडकाच्या बारीक दाण्यांचा पुरवठा करतो.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

advertisement

मराठी बातम्या/Viral/
कोंबडीला अंड द्यायला कोंबड्याची गरज असते का? 99 टक्के लोकांना माहित नसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल