आता कडकनाथ विसरा 'या' कोंबड्या पाळा, चौथ्या महिन्यात व्हाल मालामाल!

Last Updated:

एक देशी कोंबडा तयार होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिन्यात एक कोंबडा जवळपास 1 किलो वजनाचा होतो. बाजारात देशी पिल्लांनादेखील मोठी मागणी असते.

देशी कोंबड्या पाळण्याच्या तुलनेत सर्वसाधारण कुक्कुटपालन खर्चिक असतं.
देशी कोंबड्या पाळण्याच्या तुलनेत सर्वसाधारण कुक्कुटपालन खर्चिक असतं.
अभिषेक रंजन, प्रतिनिधी
मुझफ्फरपूर : काही विशिष्ट पिकांच्या उत्पादनातून आज विविध राज्यांतील तरुण शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे लाखो रुपये. शेतीपूरक व्यवसायातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. ‘कुक्कुटपालन’ व्यवसाय त्यापैकीच एक.
बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील चखेलाल गावचे रहिवासी राजू कुमार चौधरी यांचा देशी कोंबड्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आलंय. ते जवळपास 22 वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या देशी कोंबड्या आहेत. त्यापैकी वनराजा आणि ग्राम प्रिया हे दोन प्रमुख प्रकार.
advertisement
राजू सांगतात, ‘एक देशी कोंबडा तयार होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागतो. 3 महिन्यात एक कोंबडा जवळपास 1 किलो वजनाचा होतो. बाजारात देशी पिल्लांनासुद्धा मोठी मागणी आहे. या कोंबडीच्या एका पिल्लाची 30 रुपयांना विक्री होते. तर पूर्ण तयार झालेल्या कोंबड्याला प्रति किलो 400 रुपयांचा भाव मिळतो. महत्त्वाचं म्हणजे 10 हजार रुपये खर्च करून कोणीही या व्यवसायातून 3 ते 4 महिन्यांत 40 हजार रुपये कमवू शकतं’, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
त्याचबरोबर राजू असंही सांगतात की, ‘देशी कोंबड्या पालनाच्या तुलनेत सर्वसाधारण कुक्कुटपालन खर्चिक असतं. कारण देशी कोंबड्यांना दाणे द्यावे लागत नाहीत. त्यांना शेतात सोडल्यास त्या गवत खाऊन पोट भरतात. त्यामुळेच देशी कोंबड्यांच्या अन्नासाठी जास्त खर्च करावा लागत नाही. तर सर्वसाधारण कुक्कुटपालनाचा सर्वाधिक खर्च हा कोंबड्यांच्या अन्नासाठी होतो.’ राजू यांच्याकडे सध्या 600 कोंबडे आहेत. या कोंबड्यांचा एक भाग 1000 ते 1200 रुपयांना विकला जातो. कारण त्याला प्रचंड मागणी असते. म्हणूनच आजच्या तरुणांनी देशी कोंबडीपालन व्यवसायात करियर करण्यास हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/कृषी/
आता कडकनाथ विसरा 'या' कोंबड्या पाळा, चौथ्या महिन्यात व्हाल मालामाल!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement