टेक्नोलॉजी पुढे गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं सोपं झालं आहे. पण याच टेक्नोलॉजीमुळे कधीकधी समस्या देखील उद्भवल्या आहेत.
कधीकधी आपल्याकडे सर्व कागदपत्र असून देखील गाडीवर फाइन मारलं जातं. तर कधी चुकीच्या शिक्षे खाली फाइन मारलं जातं. अशावेळी आपण काय करायचं? असा प्रश्न अनेक गाडीचालकांना पडतो. अशावेळी फाइन भरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं त्यांना वाटतं.
advertisement
अशा वेळी घाबरण्याची गरज नाही; तुम्ही सहज ऑनलाइन किंवा फोनद्वारे तुमची तक्रार नोंदवू शकता.
एक उदाहरण घेऊया. समजा अचानक तुमच्या वाहनावर चुकीचा चालान आला. काय करायचं?
ऑनलाइन तक्रार प्रक्रिया:
सर्वप्रथम, तुम्ही eChallan.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'Complaint' या टॅबवर क्लिक करा. नंतर तुमचं नाव, फोन नंबर, चालान क्रमांक आणि इतर माहिती भरून द्या.
ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमच्या समस्येचं योग्य पर्याय निवडा आणि सर्व माहिती भरल्यावर 'Submit' क्लिक करा.
जर ऑनलाइन प्रक्रिया तुम्हाला सोपी वाटत नसेल, तर तुम्ही राज्याच्या ट्रॅफिक पोलिसांच्या मेल आयडीवर मेल करून, ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या फोन नंबरवर कॉल करून किंवा ट्रॅफिक कमिश्नर, एसपी ट्रॅफिक यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता.
किंवा ट्राफिक ऍपवरुन देखील तुम्ही ही तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला ट्राफिक ऍमधील ग्रेवियन्स या पर्यायावर जायचं आहे. तिथे अधिक किंवा प्लसच्या साइनवर क्लिक करायचं आहे.
तिथे तुम्हाला नाव, नंबर, इमेल आयडी, चलान नंबर, चेसीनंबर सगळं भरुन कॅपचा फील करुन सब्मिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल. ज्यावर योग्य ती कारवाइ देखील केली जाइल.